Deepali Mathane

Others

3.5  

Deepali Mathane

Others

भावभावनांचे रेशीम बंध

भावभावनांचे रेशीम बंध

2 mins
156


 मोकळ्या आकाशात मन अगदी पाखरू बनून भिरभिरणारं वय...........असंख्य स्वप्ने उराशी बाळगून काही तरी करण्याची जिद्द, मेहनतीला तोड नसलेल वय. थोडाफार अल्लडपणा, थोडा-थोडा खुळचटपणा...........कधीतरी उगाच केलेला खोडकरपणा, आपल्याला कसलीही जबाबदारीची जाणीव न होऊ देता प्रसन्न चित्ताची देणगी लाभलेलं उत्साहाने न्हालेलं वयं.


   प्रसन्नतेने उमललेल्या भावभावना सगळं अगदी सुंदर आहे हि एकच जाणीव चैतन्याची. जेमतेम बारावी झाली आणि सुरू झाला लग्नाचा विषय...........पहिलेच पाहुणे.......पसंती.... साखरपुडा........... लगेच लग्नं पोरगी माहेराहून सासरी............सगळ्या शिक्षणाच्या स्वप्नांना मिळालेलं पूर्णविरामाच आश्रयस्थान. इथूनच सुरू झाली भावभावनांची गुंतागुंत.

    

घरातल्या प्रत्येकाच्या कसोटीवर सुनेनी कसं खर उतरायला हव याचे धडे लहान-मोठे सगळ्यांकडून मिळाले.पाण्याच्या तळाचा अंदाज नसतांना आणि पोहण्याचा एकही धडा गिरवलेला नसताना जर कुणी पाण्यात ढकलून दिले तर काय अवस्था होईल नं? ................कल्पनाच पुरे.

   

अल्लडपणाला जबाबदारीच्या जाणीवेच्या काटेरी कुंपणानी कितीदा घायाळ केलं पण फुलाचा धर्म फुलण्याचा .......काट्यातही डौलाने बहरतो तोच खरा गुलाब. कितीदा कडा पाणावल्या,अश्रूंचे बांधही फुटले भावभावनांच्या सवे कधी जीवही गुदमरला..........कधी आधाराच्या वेलींनी हळूच मनमोगराही फुलला.दरवळला कधी गंध कळत गेले नात्यांचे भावबंध. कधी जिव्हाळ्याची ओढ विसावली मनी दिन-रात.........सोनेरी किरणांनी कधी कळ्या खुलल्या परसात. कधी वाऱ्याची मंद झुळूक अलवार स्पर्शून गेली.याच जाणीवेने फुलेही मोहरली..............

     

आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्तींशी आपले भावबंध कितपत दृढ करायचे याची ग्वाही आपलं मन आपल्याला देत असतं. *व.पु. काळेंनी म्हटल्याप्रमाणे एखाद्याचे आयुष्यातील स्थान हे हारातील दोऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्त्वाचे नाही असणे महत्त्वाचे आहे.* काही व्यक्तींशिवाय जगण्याची कल्पना मनाचा थरकाप उडवते. इतके दृढ भावबंध रेशमी बंधात परावर्तीत झालेले असतात. नेमके इथेच आपण नकळत स्वार्थी होऊन जातो. कुणीतरी आपल्यासाठी आहे ही जाणीवच श्रावणसरींचे सुख देऊन जाते आणि या जाणीवेतच मनं चिंब-चिंब होत जातं.


      आपल्या आयुष्यातील सगळ्याच नात्यांचे भावबंध आपण आपापल्या परिने म्हणजे कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी उपदेशात्मक, कधी आर्जव तर कधी हुकूमशाही पध्दतीने म्हणा आजन्म जपत असतो. सगळेच आपल्याला समजून घेणारे भेटतीलच असे नाही. काहींना आपल्या रागामागचं प्रेमही सहज कळतं तर काहींना प्रेम काय हेच कळत नाही........... असो ! 

    

आपण आपल वाहत रहायचं.वाटेतल्या अडथळ्यांना सहज पार करायचं.मनातल्या कचऱ्याला प्रवाहाबाहेर फेकायचं.आपल्या मुळे नकळतही कुणी गुदमरणार नाही एवढं पहायचं.इतका तर समजूतदार पणा *( माझ्या लेखी बर फक्त)* अनुभवानुसार आलेलाच असतो. 


   शेवटी काय हो ! सगळे आपलेच असतात. त्यामुळे आपल्याला सुख-दुःख देण्याचा अधिकार त्यांना आपसूकच मिळालेला असतो. ज्या व्यक्तींशी काही एक देणं-घेणं नाही, त्यांनी सुख-दुःख काहीही दिले तरी आपण मनापासून त्याचा स्वीकार करत नसल्याने ती जाणीव मनाला छळतच नाही. पण ज्यांच्याशी आपल्या भावभावनांचे रेशीम बंध जुळलेले असतात त्यांच्या कडून ही अपेक्षा आजन्म नकळतच असते न हो आणि ती असावीच असं मला वाटते.


Rate this content
Log in