नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

भाकरीची चव

भाकरीची चव

2 mins
129


एका गल्लीबोळातून जातांना भाकरी भाजण्याचा सुगंध दरवळत होता. तसा तो माझ्या नाकाला देखील झोबला. गेले कित्येक दिवस भाकरीचा घास खाल्लं नव्हतं. घराघरांत जसे ही गहूने प्रवेश केला तसे हळूहळू ज्वारी घराबाहेर होऊ लागली. एक काळ होता जेंव्हा शेतकऱ्यांच्या घरात ज्वारी खंडीने मोजले जायचे. घरी काम करणाऱ्या मजुराला, घरगाडीला आणि बलुतेदार यांना ही कामाच्या मोबदल्यात ज्वारीचे वाटप केल्या जायचे. आपले राज्य हे ज्वारीचे कोठार समजले जायचे. महाराष्ट्राच्या बाजूला आंध्रप्रदेश राज्यात तांदुळाचे उत्पन्न खूप होत असे. सीमावर्ती भागातील लोकं मात्र सदा सुखी असायचे कारण दोन्ही राज्यातील उत्पन्न येथे होत असे त्यामुळे येथील लोकांना ज्वारीच्या भाकरी सोबत तांदळाचे भात देखील खाण्यास मिळत असे. पण गव्हाच्या पोळ्या काही सणाच्या निमित्ताने खायला मिळत असे त्यामुळे त्याचे खूपच अप्रूप वाटायचे. खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात


अरे संसार संसार

जसा तवा चुलीवर

आधी हाताला चटके

मग मिळते भाकर


कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही हेच त्या काव्यातून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लहानपणी आम्हांला कष्टाची काही जाणीव नसायची. फक्त खाणे आणि उड्या मारणे एवढंच काम असायचं. आम्हांला भाकर खायला खूप कंटाळा यायचा. त्यातल्या त्यात भाकर शिळी असेल तर नाक मुरडत खायचो. सणाच्या दिवशी मात्र मऊशार चपाती खायला मिळणार म्हणून त्याची आतुरतेने वाट पाहायचो. घरात ज्वारी भरपूर प्रमाणात असायची त्यामुळे काही वेळा बाहेरून सामान घ्यायचं असेल तरी ज्वारीचा वापर केला जायचं. शाळा शिकण्यासाठी बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला. दुपारच्या जेवणासाठी डब्यात भाकर आणि त्याचसोबत खायला कधी पिठलं तर कधी डाळ असायची. पिठलं भाकर आवडतं खाद्य होतं मात्र रोज तेच म्हटल्यावर खुप कंटाळा येत असे. डब्यात चपाती कधीच मिळाली नाही. भाकरीसोबत उडदाची दाळ खूपच चवदार लागायचं. तुरीच्या दाळीच्या वरणात भाकर चुरून खाल्ले तरच पोट भरायचं. चिकन किंवा मटणच्या भाजीसोबत भाकरी नसेल तर जेवणात काही रस वाटायचं नाही. आजच्या काळातील मुलांना भाकरीची चव माहीत नाही कारण ते जेवणात गव्हापासून तयार होणारे चपाती किंवा पोळीचा वापर करतात. भाकर ही पचायला हलके अन्न आहे आणि शरीरासाठी पोषक आहे म्हणून आपल्या जेवणात ज्वारीचा समावेश असणे आवश्यक आहे.


आजकाल शेतीतून ज्वारीचा पेरा देखील कमी झाल्यामुळे ज्वारीचे उत्पन्न देखील दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जनावरांसाठी ज्वारीचे पेंड खूप चांगले खाद्य आहे मात्र पेरा कमी झाला त्यामुळे त्यांना देखील खाद्य मिळेनासे होत आहे. प्राण्यांची संख्या ही कमी होत आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी या ज्वारीच्या पेरा बाबत गांभीर्याने विचार करून निसर्गाला पोषक असे उत्पन्न शेतातून घ्यायला हवे. कारण यावर पशु-पक्षी आणि माणसं यांचे जीवन अवलंबून आहे. भाकर मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवे आणि प्रत्येकांच्या जीवनात याचा वापर वाढायला हवं असे वाटते.


Rate this content
Log in