arun gode

Others

3  

arun gode

Others

अस्मरणीय प्रसंग

अस्मरणीय प्रसंग

7 mins
251


       असे म्हणतांत जगात कुठे स्वर्ग असेल तो फक्त भारताचे मुकुट, म्हणजे कशमिर असु शक्ते. हे जग सुटल्या नंतर आपली जागा कुठे आहे. हे कोणास ठाऊक नाही. त्यामुळे असे नेहमी वाटत होते कि आपन हयात असतांना अर्धांगीनी सोबत एकदा तरी पृथ्वी वरिल स्वर्गात, म्हणजे कशमिरला जावे. तीथले नैसर्गिक सौदर्यं आपाल्या प्राकृतिक कॅमेरात आपाल्या डोळ्यांनी कायमचे टिपुन घ्यावे. मनात ही ईच्छा घर करुन बसली होती.पण नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न, योग येत नव्हते. ती पण मधे- मधे आपण केव्हा कशमिर जाणार आहो असा प्रश्न नेहमीच करत असे. आपल्या जीवनात कधी कशमिरचा सुर्योंदय उगवेल कि नाहीं ?. अशी शंका सारखी व्यक्त करत असे. ईच्छा असतांनाही कशमिर मध्ये होत असलेल्या रोजच्या आंतकवादी घटना आणी तीथे असलेली अशांती मुळे कशमिर साठी पाउले उचलीत नव्हती. वेळ निघुन चालाला होता.आता एक- दोन वर्षात आपान सेवानिवृत्त होणार. नंतर पारिवारिक समस्या पण डोके काढणार. शरिराने पण कमजोर होणार. आता जर आपण जावु शकलो नाही.तर भविष्यात जाने आपल्या साठी कठिन होणार. आपल्या पृथ्वी वरिल स्वर्ग बघने शक्य होणार नाही. असा नेहमी विचार करितच होते. व आपाले विचार अनायसे एका सहकर्मि सोबत चुकुन बोलुन गेलो होतो. कदाचित तो पण याच विचारत अडकला असावा. म्हणतात डुबनेवाले को तिनके का साहरा. माझ्या विचाराशी सहमती त्याने दर्शविली होती. अधिक उत्साह अन त्यातुन फालगुन मास, असा हा मित्र म्हणालां, या सर्व बाबी होतचं राहणार . हिम्मत करुन आपण दोघेही कशमिरला जावुन येऊ. मी त्याला गंमत केली. आपण दोघेही कशमिरला जावु हे खरं आहे, पण वापस येवु कि नाही हे मला माहित नाही. आणी तु पण हे विसरुन जा. तो हिम्मत देत म्हणाला , चला, तर पहिले, समोरचे भविष्य कोणास ठाऊक आहे!.

   त्याची हि हिम्मत बघुन मी पण आपले मन घट्ट केले. मग पत्नीला सांगितले कि आपण आता लवकरच कशमिरला जावु !. तिचा माझ्या वर विश्वास बसला नाही. स्मित हास्य करुन म्हाणाली आपण केव्हा पासुन कशमिरला जावुन राहिलो आहो. मला वाटले हीला काही विश्वास बसणार नाही. बाप दाखव नाही तर श्राध्द कर, अशी परिस्थिति माझ्या वर आली होती. नंतर आम्ही कशमिरला जाण्याची योजना बनवली.प्रथम दिल्लीला जाणार,दिल्ली बघणार, व विमानाने तिथुन मग श्रीनगरला जाणार.योजने प्रमाने आम्ही दोघांनी बूकिंग केली होती. त्याच्या परिवारत ते दोघे व दोघी मुली, आणी आमचे मुले मोठी झाली होती. व ते कंपन्या मध्ये नौकरी साठी बाहेर शहरात होती. शेवटी तो दिवस उगवला. दोन्ही परिवार दिल्लीला पोहचले. दिल्लीतील सर्व प्रेक्षणीय स्थान बघितले. आता दुस-या दिवशी सकाळच्या विमानाने आम्ही श्रीनगरला पोहचलो. मनात जेवढी कशमिरला बघयची तीव्र ईच्छा होती,तेवढीच दहशत डोक्यात घर करुन बसली होती.बाजारत तुरी आणी भट भटणीला मारी. भिती सर्वांना वाटत होती.पण व्यक्त कोणी करत नव्हता.प्रत्येकाला वाटत असे. असे बोलुन कोणाची हिम्मत खसवायची नाही व उत्साह पन कमी करायचा नाही. एकदाचे आम्ही श्रीनगरला पोहचलो होतो.पहिलेच ठरविल्या प्रमाने बोटहाऊस मध्ये थांबणार होतो, मग डायमंड बोट हाऊसला मुक्काम ठोकला. दुसरया दिवशी श्री नगर मधील सर्व प्रेक्षणीय स्थान बघितले होते. आम्ही सर्व खुश होतो. संध्याकाळ झाली होती. आता आपण शहरातच जेवन घेवुन मग बोटहाऊस मध्ये विश्राम घेवु. आणी उद्या मग पहेलगमला जावु.अशे ठरले होते.

    ठरल्या प्रमाने आम्ही एक हॉटेल मध्ये जेवण घेण्यासाठी गेलो.तीथे जेवन ऑर्डर करतांना कोणीची भाजी घ्यायची ठरवित होतो. तेव्हा मित्राच्या छोट्या मुलीने काका आपन दमआलु घेवु असे म्हणाली. सर्वांनी त्याला होकार दिला. जेवन आण्यासाठी बराच वेळ लागत असक्यामुळे मी त्या वाढप्याला म्हटले. किती वेळ लागणार !, तो म्हणाला सहाब सब्जी बन रही है. मी गंमत करत म्हणाले अरे, भाई दमआलु बन रहे है, बनाने उसका दम निकल रहा है. सगळे हसायला लागले. सर्वांची अपेक्षा होती कि छान छोटे-छोटे पहाडी आलुची दमआलु खायला मिळनार. त्याने जेवणाची सामग्री आनने सुरु केले होते. शेवटी दोन प्लेट दम आलुची भाजी आणली होती. त्या दोन प्लेट मधील आलुचा आकार पाहुन आम्ही सर्वंच जन आश्चर्य चकित झालो. आलुची आकार बघुन मि म्हटले. अरे भैय्या ये कौनसी सब्जी है. मुझे तो ये दमआलु कम और बॅमआलु ज्यादा लगते है. साहब यहां तो सिर्फ बॅम ही चलते है. आम्ही सगळे जन खुप हसलो . नका नका म्हणा अन पायली भर आंबिळ चाखा. शेवटी हसत –हसत बॅम आलुच्या भाजीचा आनंद घेत जेवन पूर्ण केले होते.

      दुसरया दिवशी ठरल्या प्रमाणे आम्ही पहेलगमला जाण्यासाठी निघालो. नियत स्थानवर दुपारी पोहचलो होतो. तीथे पहेलगमला जाण्यासाठी घोडयावर बसुन जावे लागते. त्यासाठी आम्हाला घेवुन जाण्यारया घोडे वाल्यांना ठरवीले होते. ठरल्या प्रमाने आम्ही सर्वजन घोड्यावर बसलो. लग्ना नंतर तो माझा दुसराच घोडयावर बसण्याचा प्रसंग होतो. भित- भित बसलो होतो. घोडे सर्वांना घेवुन ओबड-खाबड, नाग-मोडी, अरुंद अशा वाटेने पहाड चढत होते. ते पाहुन सर्वांनाच भिती वाटत होती .संगाळ्याची भीती घालवण्या साठी मी आपल्या पत्नी कडे पाहुन म्हणालो.लग्नात घोडयावर बसलो तेव्हा ही आफत गळ्यात पडली आणी मला पहेलगमला घेवुन आली. आता दुस-यांदा घोड्यावर बसलो. माहित नाही कोणची आफत येणार आहे ! सर्वजन हासुन थोडे तनावमुक्त झाले होते. प्रवासाच्या दरम्यान माझा घोडा थोडा तिरपा- तिरपा जात होता.तेव्हा माझी पत्नीने त्या घोडेवाल्याला, अरे भैय्या इनका घोडा क्यों तिरछा-तिरछा चल रहा है. वो हसते हुयें बोला,मॉडम उसने अभी कॉलेज में दाखिला लिया है. उसका प्रक्षिशन चल रहा है.अभी डीग्री नहीं मिली है. अरे बाकी सब तो सही चल्र रहे है. वो हसते हुआ बोलो, वो पुराने डीग्री होल्डर है. उनकी पी.एच.डी भी हो चुकी है. कठीन घोडेस्वारी करत शेवटी आम्ही त्या जागी पोहचलो. तीथले नैसर्गिक सौंदर्य बघतचं होतो. तितक्यात त्या ठिकाणी एकदम हुडदुंग मचला होता. सर्व जन ईकडे-तिकडे पळाला लागले होते.लगेच माझ्या लक्षात आले कि भूकंप आला आहे. मी बघितले कि मोठे मोठे झाडे आमच्यापासुन खुप दूर आहे आणी आम्ही सर्वजन मोकळ्या मैदानात सुरक्षित आहो.मी सर्वांना सांगितले की आपल्याच जागेबर खाली बसा .मी पन बसलो. थोड्या वेळानी कंपन येने बंद झाले होते. आनी नंतर सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, पण आम्ही सर्वजन खुपच घाबरुन गेलो होता आणी सावध ही झालो होतो. मी भूकंप अनुभाग मध्ये बरेच वर्ष काम केले होत. त्यामुळे मला या विषयी थोडी माहिती होती. रोज मरे त्याला कोण रडे . पृथ्वी हादरने बंद झाल्यावर तो घोडेवाला पुन्हा त्याच जागेवर आम्हाला वापस घेवुन जाण्यासाठी आला होता. असे भूकंप ते रोज अनुभवतात त्यांच्या साठी दुसर ग्राहक म्हत्वाचे असते. करण मिनीटाची फुर्सत नाही, अन दिडकीची कमाई नाही. मला माहिती होती की मुख्य भूकंप म्हणजे अधिकत्त्म तीव्रतेचा भूकंप येण्यापूर्वी व मुख्य भूकंप  आल्या नंतर भूकंपाचे हलके-हलके कमी तीव्रतेचे भूकंप काही काळ येने चालुच असतात. म्हणुन मी त्या घोडेवाल्याला नाश्ता चाय घेण्याच्या निमित्तने थांबण्यास सांगितले. तो गडबड करु नये म्हणुन त्याला पण आमच्या सोबत चलायला सांगितले होते.पण तो आला नाही. त्याने लवकर- लवकर येण्याचा आग्रह केला होता. 

     आम्ही नंतर चाहा घेण्यासाठी गेलो. जवळ-जवळ अर्धा तासाच्या वर वाट बघितली होती. जेव्हा पुन्हा दुसरा झटका आला नाही. त्या नंतर भीत- भीत वापसीचा प्रवास सुरु केला होता. देव तारी त्याला कोण मारी.मग नियत जागेवर आम्ही सुखरुप पोहचलो होतो. गरज सरो अन वैद्य मरो. पोहचल्या वर सर्वांच्या जीवात –जीव आला होता.कारण पुन्हा घोड्यावर वापसी प्रवास करतांना जर धरती हादरली. घोडे जर त्या खरतड,अरुंद ,कठीन मार्गावर बिथरले व समजा सैरे- वैरे पळत सुटले तर आम्हचे काय होईल, या विचाराने आम्ही सर्वजन , दाखवत नसलो तर पृथ्वीच्या हादरण्या पेक्षा जास्त हादरलो होतो. तीथे पोहचल्यावर तनाव कमी करण्यासाठी मी पुन्हा लक्ष्य वेधुन घरवाली कडे बघुन गमंत केली.बघितलं का दुस-यांदा घोड्या वर बसल्याचा परिणाम. सगळे हसायला लागले. ती म्हाणाली, झाली कां घोड्यावर बसाची हाऊस पूर्ण.कां बोलऊ पुन्हा घोडेवाल्याला ?.

    आमची गंमत त्या घोडेवाल्याला समजली नाही.तो म्हणाला आप सब क्यों हंस रहे हो.? अरे कुछ नहीं, वो भूकंप के बारे में है. तो म्हणाला ये तो हमारे यहां हमेशाही आते है. इसे डरकर हम अपना धंधा थोडी छोड सकते है. तेव्हा माझा सहकर्मी म्हणाला ये साहब उसी में काम करते है. माझा कडे बघुन तो म्हणाल, आप इसे रोकने के लिए क्यों कुछ नहीं करते है. मैंने जवाब देते हुयें कहा. आप प्राकृतिक आपदाओं को आने से नहीं रोक सकते. लेकिन सतर्क, जागृत और उसके संबंधी जनकरी रखकर अपने आप को सुरक्षित कर सकते हो. 

    आपाल्या देशाला आपन चार भूकंप क्षेत्रात भूकंपच्या सक्रियेतेनुसार विभागले आहे. भारताचा ईशान्य भाग हा जोन चार मध्ये येतो. हा देशात सर्वात संवेदनशिल क्षेत्र आहे. पृथ्वीचा वरिल आवरणाला किंवा कवच याची खोली पृष्ठभागा पासुन फ्क्त 35 ते 40 आणी समुद्रच्या पृष्ठभागा पासुन् कमी जास्त 70 किलोमीटर फ्क्त आहे. त्याच्या खालचा भाग हा वितळलेला किंवा द्रव पदार्थच्या रुपात असतो . त्यावर पृथ्वीच्या आत जे मोठे-मोठे खंड या द्र्व मध्ये सरकत असतात.जेव्हा हे खंड ( टिटॉनिक प्लेट्स) एका मेकाला घर्षन करतात तेव्हा भूकंप येतो. जर भूपृष्ठाला समांतर टिटॉनिक प्लेट्स घासल्या गेल्ल्यावर भूपृष्ठावर भूकंप जानवतो. किंवा जर ह्या टिटॉनिक प्लेट्सचे सागरा मध्ये अनुलंब घर्षन झाले तर सुनामी येते. आपल्या हिमालयाची निर्मितीही विरुद्ध दिशेने येणारा दोन टिटॉनिक प्लेट्स एक मेकावर चढल्या मुळे झाली आहे.ही प्रक्रिया अजुन थांबली नाही.त्यामुळेच हिमालयाची उंचीही सारखी वाढत आहे.म्हणुन हिमालयला जगातील तरुण पर्वताची संज्ञा मिळाली आहे. त्या घोडेवाल्यानी चांगली माहिती दिल्या बद्दल आभार प्रगट केला.व तो निघुन गेला. आम्ही पण आपल्य जागी पोहचलो. सर्वांनी लांब श्र्वास घेत प्रकृतीने आपल्या वर दया केल्या बद्दल आभार प्रगट केले.


Rate this content
Log in