Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

अशरिरी

अशरिरी

6 mins
837


त्याची अन तिची गेल्या दहा वर्षापासून ची मैत्री अगदी निखळ निकोप म्हणावी तशी आणि दोघांच्याही घरात ते मान्य होते.

दहा वर्षांपूर्वी तिच्या ऑफिसात तो बदलून आला त्यावेळी ती टेबलला सिनियर होती ऑफिसच्या खाचाखोचा तिला चांगल्याच माहीत होत्या प्रत्येकाची नस आणि नस ती जाणून होती

गोरापान उंचापुरा घार्‍या डोळ्यांचा हा माणूस तिला फार शिष्ट वाटला होता तिने मनाशी ठरवले की याच्याशी मुळीच जास्त संबंध ठेवायचा नाही व त्याला कोणतीच मदत देखील करायची नाही कारण तो येण्याआधी त्या टेबलला असणारी तिची चांगली मैत्रीण होती व याच्या येण्याने तिला लांब बदलून जावे लागले होते.

त्याला काही ना काही कारणाने प्रत्येक वेळी तिला विचारावे लागले तिथले सीनियर म्हणून तिचा सल्ला घ्यावा लागे पण ती मात्र आखडून वागत होती. दोघांचे शब्दाशब्दाला खटके उडत असत त्या दोघांच्या शीतयुद्धाची मजा सगळं ऑफिस घेत असे. अगदी बॉस पर्यंत देखील या बातम्या पोहोचल्या होत्या नंतर नंतर या दोघांच्या भांडणाचा त्रास सर्वांना होऊ लागला. टेबलची कामे अडू लागली तेव्हा मात्र बॉस ने एक दिवस ठरवले की आता बास झाले या दोघांना पण चांगली वॉर्निंग दिली पाहिजे

एका शुभ सकाळी बॉसने त्यांना बोलावून घेतले दोघे देखील दबकत दबकत आत गेले.

अरे अंजली बस ,शंतनू तू देखील बस, हा मग काय म्हणते आपले ऑफिस... कशी आहे प्रगती? आजकाल आपल्याकडे बरीच छुपे युद्ध चालू आहेत म्हणे दोघेपण एकमेकांकडे बघू लागले. अरे एकमेकांकडे काय बघता तुम्ही दोघे भांडता वाटतं?

नाही.. नाही सर. मी नाही आम्ही.. नाही .. असे चाचरत दोघेपण बडबडू लागले.

नाही ना भांडत चला तर मग, एकमेकांना तिळगूळ द्या आणि गोड बोला बरं आज पासून अरे आज संक्रांत आहे बॉस नी दोघां पुढे तिळगुळाचा डब्बा केला दोघांनी एकमेकांना तिळगूळ दिले व सरांना देखील दिले त्या दिवसापासून दोघांचे भांडण संपले. त्या दिवसापासून दोघांचा एकमेकांशी चांगलं जमलं अगदी घट्ट मैत्री झाली बऱ्याच वेळा डिपार्टमेंट च्या कामासाठी दोघांना पण रात्री आठ आठ वाजेपर्यंत थांबावे लागे. मग आपल्या गाडीवर तो तिच्या घरापर्यंत तिला ड्रॉप करीत असे त्यात कधी कोणाला काही वावगे वाटले नाही. दिवस वर्षे भराभर चाललेली होती दोघेही आता चाळिशीला आले. मुले मोठी मोठी होऊ लागले दोघांच्या पण फॅमिलीत एकमेकांशी मैत्री झाली होती. कित्येक वेळा ऑफीसच्या टूरवर देखील दोघे मिळून जात. एखादी मनातली गोष्ट तो आपल्या बायकोच्या आधी तिला सांगत असे ती देखील एखादी गोष्ट नवऱ्याला न सांगता पहिली त्याच्या जवळ सांगत असे. दोन्ही फॅमिली कधी कधी एकत्र पिकनिकला जात असत लोकांना त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटत असे

ऑफिस मध्ये प्रमोशन चे वारे होते, बॉस रिटायर होणार होते आणि त्या जागी शंतनु चा नंबर 100% लागणार होता. असे सर्वांनी गृहित धरले शंतनूने आपली क्षमता सिद्ध करून दाखवली होती तो जरी या सर्वांना जुनियर असला तरी त्याने कंपनीच्या व्यवस्थापनात बरेच बदल केले बऱ्याच खाचाखोचा शोधून कंपनीला फायद्यात आणून दिले होते त्याच्याकडे गुणवत्ता असल्याने तो मॅनेजमेंटच्या पातळीवर लाडका होता पण इतके सारे असूनही काही तरी कमी पडले कुठे तरी माशी शिंकली आणि ऐन वेळी प्रमोशन ला त्याचे नाव कॅन्सल होऊन सुरेंद्र नायर चे नाव पुढे आले. नायर साठी वरून फोन येत होते त्याचा काका मॅनेजमेंट मध्ये होता. त्याने आपल्या पुतण्यासाठी वजन वापरले आणि शंतनुला डावलले गेले दोघेदेखील कलकत्ता टूरवर होते ऑफिस मधून शंतनुला फोन आला. दोघेही खूप disturb झाले ऑफिसचे व्हेरिफिकेशन चे काम अर्धवट सोडून हॉटेलवर आले रात्री दोघे पण जेवायला खाली उतरले शंतनु एक शब्द देखील बोलला नाही शंतनूने ड्रिंक मागवले. त्यात काही नवीन नव्हते बऱ्याच वेळा तो एखादा पेग रात्री घेत असे पण जेव्हा तो पेग वर पेग रिचवू लागला तेव्हा मात्र याचा बॅलन्स सुटला आहे हे तिला जाणवले..

तुला सांगतो अंजली हे त्या *** स्वामी चेच काम असणार नाहीतर माझं प्रमोशन पक्क होतं, होतं म्हणजे काय माझा हक्कच होता. इतके दिवस काय फुकट ----- घासली का?

आता त्याची जीभ देखील सैल सुटू लागलेली होती.

अरे शंतनू स्वतःला सावर ही काय एवढीच वेळ आहे का? अरे अजून किती तरी आयुष्य पडलय.

अशी कितीतरी प्रमोशन्स मिळतील तुला!

पण आता माझ्यावर अन्याय होतोय ना त्याचं काय ? हे *** माझ्यावर जळतात.

***** साले गेल्यावर बघतो एकेकाला...

मद्याचा अंमल आता वाढला होता

अरे शंतनू सुटाबुटात तुझ्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, अशा शिव्या शोभत नाहीत तू आता रूम वरती चल असे म्हणून ती त्याला हाताला धरून त्याच्या रूमवर घेऊन गेली

रूमवर गेल्याबरोबर तो अंजलीच्या गळ्यात पडून एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला एक तर प्रमोशन हातचं गेल्या फ्रस्टेशन वरून मद्याचा अंमल ती लहान मुलासारखी त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवून शांत करू लागली त्याला थोपटू लागली हळू हळू तो शांत होत गेला आणि अंजलीची उबदार मिठी त्याला जाणवू लागली स्त्रीचा मादक स्पर्श त्याच्या डोक्यात भिनू लागला त्याचे हात त्याच्या नकळत अंजलीच्या अंग प्रत्यंगाचा मागोवा घेऊ लागले.

अंजलीने त्याच्या मिठीतून सुटण्याची बरीच धडपड केली, पण त्याची पुरुषी मिठी तिला सोडविता येईना. त्याने आपले ओठ तिच्या ओठात अडकवले आणि तिच्याही नकळत हि त्याला प्रतिसाद देऊ लागली. अखेर त्याच्या मनातलं आणि शरीरातलं वादळ अशा रीतीने शांत झालं. स्त्रीला आपला मान अपमान सारं काही झेलता येतं राग लोभ प्रेम यासारख्या भावना चांगल्याच कंट्रोलमध्ये ठेवता येतात पण पुरुष मनाने फार कमकुवत अपमान तर लगेच जिव्हारी लावून घेणारा आणि तेव्हा त्याला सावरायला स्त्रीच लागते किंवा मदिरा.

गेल्या दहा वर्षात कधीच जे घडलं नाही ते अशा बेसावध क्षणी घडले जे घडू नये ते घडलं होतं आज पर्यंत त्यांची मैत्री निखळ होती, अशरीरी होती.

पण आज तिला कलंक लागला स्त्री आणि पुरुष यांची निखळ मैत्री होऊच शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं लोणी आणि विस्तव एकत्र आले की पाघळणारच. त्यानंतर दोघांनाही एकमेकांच्या नजरेला नजर देणं अशक्य झालं एकमेकात संवाद साधणे अवघड झालं दुसऱ्या दिवशी सकाळी तो दहा वेळा तरी अंजलीला सॉरी म्हणाला ती काहीच न बोलता शांत राहिली होती.

ऑफिसमध्ये दोघेही एकमेकांना टाळू लागले बोलणे तर दूरच राहिले शंतनु व अंजली काहीतरी बिनसलंय हे सगळ्या ऑफिसला कळलं गेल्या दहा वर्षातल्या त्यांच्या मैत्रीला एकाएकी ग्रहण लागलं होतं सगळेजण आडुन आडुन चौकशी करत होते, कि नक्की काय झालं बुवा यांचं !पण ते थांगपत्ता लागू देत नव्हते.

आज दुपारचा टिफिन माझ्याबरोबर केबिनमध्ये भेट, अंजलीने मेसेज केला शंतनू गुपचूप एक वाजता तिच्या केबिनमध्ये शिरला. अंजली त्याच्याकडे पाहून मनमोकळं हसली.

ये बस !तो आज्ञाधारकपणे बसला पण त्याच्या नजरेत एक अपराधीपणाची भावना होती तो तिची नजर टाळत होता.

सगळं करून सवरून आता काय लांब लांब पळतोस..

अंजली मी तुझा अपराधी आहे पण मला माफ कर मी काही मुद्दाम केलं नाही त्या दिवशीचा मी जेवढा सच्चा होतो तेवढाच स्वच्छ मी आज देखील आहे पण मला तू आवडते. तुझ्याइतकीच मी पण अपराधी आहे किंवा तुझ्या पेक्षा थोडी जास्तच दोषी आहे. अरे मग त्यात एवढं अपराध्यासारखं वाटून घ्यायची गरज नाही, तू तरी मद्याच्या अंमलाखाली होता परंतु मी तर शुद्धीवर होते ना तू तरी प्रमोशन खोकल्याच्या दुःखात चूर होतास पण मला काय झालं होतं खरे तर मीच तुला आवरायला पाहिजे होते असं जे झालं ते झालं पण आता त्याची खंत करून उपयोग नाही.

खरंच अंजली त्याने विचारले त्याने तिचे दोन्ही हात हातामध्ये धरून एकदम आनंदाने हलवले त्याचे डोळे चमकत होते मग आपली मैत्री पूर्वीसारखीच अबाधित राहील ना??

नाही. तिने ठामपणे उत्तर दिले.

का, अंजली का नाही?? त्याचा आवाज थरथरत ला शंतनु आता ऑफिसची ब्रांच तू तरी बदलून घे किंवा मला तरी बदलून जाऊ दे.

कारण आता पहिल्यासारखे निखळ मैत्रीचे संबंध राखणे आपल्याला जमणार नाही कदाचित एकदा चुकून घडलेली चूक आपल्या हातून वारंवार होऊ लागेल, कदाचित त्याची आपल्याला चटक लागेल. जे तारुण्यात घडलं नाही ते चाळीशीत आल्यावर तारुण्य उताराला लागल्यावर घडलं ते पुन्हा पुन्हा घडत राहिले तर आपल्या दोघांचा एकदा घडली तर ती आणि घडला तर तो आपल्या घरच्यांचा विश्वास घात तुझ्या बायकोचा आणि माझ्या नवऱ्याचा किती विश्वास आहे.. आपल्यामुळे आपल्या मैत्रीवर त्याला तडा न जाऊ देता वेळेतच आपल्या वाटा बदललेल्या बर्या. आपण फोनवर बोलू एकमेकांना मेसेज करू चॅटिंग करून आपल्याला भेटण्याची अजून कितीतरी मार्ग आहेत

शंतनु आज पर्यंत तू माझा सखा मित्र जिवलग सुरूच होता चांगला मित्र होता.. पण एका सीमारेषेच्या पुढे आपण कधी गेलो नाही माझ्या नवऱ्याच्या विश्वात तुला थारा नव्हता तर तुझ्या विश्वात माझ्या नवऱ्याला थारा नव्हता पण हे दोन गोल एकमेकाला समांतर होते पण आता तसं नाही आता ती सीमारेषा नष्ट झालेली आहे तेव्हा ती अंजली तू आता विसर

वेदनेने त्याचा चेहरा पिळवटलेला डोळे व्याकूळ झाले प्रमोशन तर गेलेच पण अंजली सारखी सख्खी मैत्रीण पण गमावले पण आता त्याच्या हातात काहीच नव्हते

चारच दिवसात अंजलीने काय कळत फिरवली माहित नाही परंतु त्याची बदली दुसऱ्या बाजूला झाले तो जाताना तिला भेटायला गेला मोठ्या सहजपणे तिने त्याला आलिंगन दिले गुड बाय टेक केअर असं सांगून त्याला निरोप दिला.Rate this content
Log in