अपयश
अपयश
यशाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे अपयश..........!!
प्रत्येकाच्या वाट्याला थोड्याफार प्रमाणात येणार एक हक्काचे स्थान..............!!
पण तिथे न थांबता जिद्दीने आपल्या साध्यावर लक्ष केंद्रित करत पूर्वी झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून यशाच्या दिशेने मार्गक्रमण करायचे..............!!
हार मानून गप्प बसू नये आणि अपयशाने खचूनही जाऊ नये.........!!
एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावी की आपल्या पेक्षा जीवनात काहीही मोठं नाही,
आपण आपल्या आयुष्यात काही तरी निश्चितच चांगले करू.........!!
अपयशाने जीव गमवावा एवढे शुल्लक कारण पुरेसे नाही हो हे सुंदर आयुष्य संपवायला.........!!
खूप काही आहे आयुष्यात करण्यासारखं........!!
फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे...........!!
शेवटी काय तर आपलं यश-अपयश हे आपल्या नजरेत असावं...........!!
इतरांच्या दाखल्याची त्यासाठी गरज नसावी..........!!
कारण आपण काय फेस करतोय हे फक्त आपल्याला ठाऊक असतं............!!
