अपयश ही यशाची कितवी पायरी???
अपयश ही यशाची कितवी पायरी???


आयुष्यात सहज यश का मिळत नाही???
का असा काही अपवाद आहे की गरिबांना यश मिळत नाही की अजून काही वेगळच असेल कदाचित???
एक सामान्य मुलगा लहान पणा पासुन कष्ट त्याच्या नशिबी हे तो कुणाला सांगु शकत नव्हता आणि बोलू ही शकत नव्हता त्यांनी काय करावं काय नाही याचा काही नेमच लागत नव्हता. प्रत्येक गोष्टीत अपयश त्याने कुठे तरी ऐकल होत अपयश यशाची पायरी आहे पण त्याच्या मनात एकच प्रश्न अपयश ही यशाची पायरी आहे खर आहे पण कितवी पायरी???? आणि किती वेळा अपयश सहन करायचं याचा काही नेम ????
तो अक्षरशः थकला होता.
झालं असं की वयाच्या १० वर्षा पासून कष्ट करायला लागला. तेव्हा सर्व बोलायचे कष्ट कर खूप पुढे जाशील त्यांनी लोकांचं ऐकल आणि कष्ट करायला लागला शिक्षण सुद्धा चालू होतं आणि कामही काम करून करून त्याच बालपण नाहीस झालं तरीही कष्ट काही संपेना त्याच्या मनात नेहमी एकच गोष्ट घर करायची एक दिवस यश मिळणार किती तरी लोकांचा आदर्श समोर ठेवला तरीही अपयश काही संपेना मग त्याने विचार केला की प्रत्यक्षात आपल्याला अपयश सहन करावा लागत मग आपण स्वप्नात का होईना सर्व मिळवू शकतो त्याने स्वप्नात जगायचं ठरवलं
पण त्यातही अपयश ते कसं सांगतो -
एक दिवस तो विचार करून झोपला की आज स्वप्नात काहीतरी जिंकायचंच झोपेत त्याने विचार केला की सुरुवात कुठून करावी सगळी स्वप्न भुतांचीच दिसतायत त्यात काय करावं ते ही सुचेना कारण लहानपणा पासून आई बाबानी घाबरवलेल असत झोप नाही तर भूत येईल पण कधी ते आलाच नाही आपनच घेऊन आलो काल्पनिक भूत चित्रपट किंवा मालिका या सर्व त्यांच्या कारखाने आहेत तिकडे तयार होतात आणि ते बघून आपलं मन एक काल्पनिक भूत तयार करत. आयुष्यात जे मिळालं नाही त्या साठी स्वप्न बघावं तर ते अस.
तुम्ही कधी स्वप्न पाहिले का ????
तुम्ही र
ाजा झालात किंवा एखाद्या कंपनी चे मालक झालाय जस ते मालिका मध्ये चालत ना तस मी आजवर जेवढ्या मालिका पहिल्या त्या सर्वात एक गोष्ट सारखी आहे सर्व मालिका मधील नट हे त्यांच्या स्वतःच्या ऑफिस मधेच कामाला जातात असा एखादा सामान्य माणूस किंवा रोजंदारी वाला नट नसतोच मुळात कधी हे सुद्धा एका स्वप्ना सारखच आहे. प्रत्येक मालिकेतील मुख्य अभिनय कर्ता हा एका कंपनी चा मालक असतो हे हसण्यासारखं नाही का तुमच्यासाठी असो.
त्याने स्वप्न पाहायला सुरवात केली आधी त्याला निरनिराळे स्वप्न पडले पण त्यात मध्ये तो भरकटला.
त्याला एका मुली सोबत प्रेम झालं तो अत्यंत गरीब। आणि ती श्रीमंत त्याला आधी वाटलं की आपलं काही मेळ जमणार नाही पण त्याने हिम्मत करून तिला सांगितल की मी एका कंपनी चा मालक आहे माझ्यावर प्रेम करशील का ???
मुलगी हुशार होती खुप शिकलेली सुद्धा होती तिने त्याला चारा नाही टाकला परंतु तो खुप वेडा झाला होता तिच्या मागे त्याने परत तिला मागणी घातली तिने प्रश्नाचं उत्तर देणे टाळले
एक दिवस सोन्याचा उजाडला कारण एवढ्या दिवसात तिला त्याच्या सोबत राहून राहून त्याचा लळा लागला होता आणि नकळत ती त्याच्या प्रेमात पडली तिचे वडील हे खुप मोठे उद्योगपती होते त्यांना तिने सांगायचं ठरवलं.
आजकाल मुलं आणि मुली खुप रोमँटिक होतात आणि एखाद्या सुखलेल्या नदी काठी वचन देतात एकमेकांना की मरेंगे पर एक दुसरे का साथ नही छोडेंगे आणि काही दिवसात शारीरिक संबंध झाले की मुलगा चालला आपल्या वाटेला आणि मुलगी चालली आपल्या वाटेला. कारण मुलाचं मन भरत आणि मुलगी कंटाळले मग काय दोघे एकमेकांपासून लांब होतात आता याला प्रेम म्हणायचं ही आकर्षण ???
कथा अर्धवट आहे...
आपण यावर टिप्पणी द्यावी की आपल्याला पुढील भाग हवा की नको???