Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

अनुभव असाही..

अनुभव असाही..

2 mins
22


    *मी व भावजय ६ तारखेला पहाटेच ४ वाजता माथेरानला जायला निघालो.सुनेला व तिच्या आईला त्यांच्या घरून घेण्यासाठी तिथे पोहोचलो व लक्षात आले की डावीकडील मागील चाक पंक्चर आहे.*

  *त्यांना घेवून आम्ही चार पेट्रोल पंप गाढले पण कुठेही टायरचे दुकान चालू नव्हते.तसेच आणखी पुढे आलो.टायरचा जळाल्याचा वास आला तसे वगेचच थांबलो.मेन हायवे वर इलाजच नव्हता.*

   *नेटसर्च केले कोणी मॅकनीक येईल का?पण हाय!कोणी तयार होईना. गाडीतील स्टेपनी काढली पण पान्हा सापडेना.हाय रे देवा!असे म्हणत काही गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला पण जशी काय आम्ही भूतं आहोत असे आमच्याकडे पाहायचे व निघून जायचे.त्यातील एकाला आमची दया आली व तो थांबला.पान्हे काढले.मदत केली व एकदाचे चाक बसले.हा माणूस खरच देवदूतच वाटला आम्हांला.*

   *पुढील प्रवास सुरू व्हायला या टायरने आमचे तब्बल दीड तास वाया घालवले.माथेरानला कवी संमेलनासाठी जायचे होते.सुट्टी होती.भावजय,सुनबाई,सुनेची आई व मी अशा मस्त फुल्ल फोर धमाल करायची असे ठरवले पण सुरूवातच या पहिल्या अनुभवाने झाली.असो..हा ही अनुभव घेवून पाहिला.पुढे माथेरान स्थळी पोहोचलो.तिथे आगगाडी वेळे नव्हती.मग काय जी वसुधा आज वयाच्या पंचावन्न पर्यंत घोड्यावर बसायला घाबरत होती ती घोड्यावर बसली.व तो एक वेगळा नवअनुभव घेतला. घोडा बिचारा आपले ओझे पेलतोय ही सल मनात होती.पण इलाज नव्हता.*

   *इच्छीत स्थळी पोहोचलो.बाकीचे लवकर पोहोचलेले चहा ,नाष्टा करून फिरायला चालले होते.आम्हांला ना नाष्टा मिळाला ना चहा.पण चहा तेथील भाभीने चहा करून दिला आमचे थकलेले चेहरे पाहून.*

   *मग दिवसभर छान निसर्गाच्या कुशीत रमलो.झकास फोटोसेशन केले.थोडा आरामही केला .पोटभर गप्पाही मारल्या. संध्याकाळी छान तयार होवून काव्यसंमेलनाला हजर राहिलो.प्रथम भावजय व सुनबाईची आई पुढे गेल्या.मी व सुनबाई आवरत होतो.तेवढ्यात आमच्या रूममधे माकड आले व त्याला पाहून आम्ही घाबरलो.त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला तर ते आमच्याकडेच रागाने पाहत होते .दात दाखवत होते.घालवले बाई त्याला कसेतरी.मग काव्यसंमेलनात गेलो.ते छान झाले.मधेच माकडांची फौज डोकावून जाई.*

   *दिवस संपला.दुसर्‍या दिवशी सकाळी आवरून चहा नाष्टा करून परतीच्या प्रवासाला लागलो.येताना.. महडचा गणपती,नारायणी धाम,खोपोलीचे गगनगिरी महाराजांचे दर्शन घेवून लोणावळ्याला परत फोटोसेशन केले व घरी यायला सात तारखेची संध्याकाळ झाली.घरी सहा वाजता आलो*

 *अशा प्रकारे आम्ही फूल फोर धमाल केली.*


Rate this content
Log in