Sangita Tathod

Others

3  

Sangita Tathod

Others

- - - - अन तिने मला सावरले

- - - - अन तिने मला सावरले

9 mins
208


   राणी आज बरीच उशिरा ,हॉस्पिटलमधून घरी आली होती .आल्या आल्या ,अंघोळीला गेली .फ्रेश होऊन आली .व हिनीने तिच्यासाठी  गरमा गरम चहा करूनच ठेवला होता .चहा सोबत ,दोन टोस्ट राणीने खाल्ल्या .राणीचा थकलेला चेहरा बघुन वहिनी म्हणाली ,


"राणी खूप थकली वाटतेस या महिन्यात . काही दिवस सुट्टी घे ना ? "


"नाही गं वहिनी .कामच काय आहेत मला ? घरी  तर तू मला काहीच करू देत नाहीस .कामाची

 इतकी सवय झाली आहे ना आता ,की घरी  कारमणार नाही ."राणी

     राणीचा भाचा राणीजवळ आला, "आत्या ,मला हे ,सायन्स चे काही कळत नाही. प्लीज ,समजवून सांग ना ."शुभम

    मिठ कसे तयार करतात ,हे राणीने शुभमला समजावले .आत्याला थँक्स यू म्हणुन 

शुभम निघून गेला अन राणीला तिच्या शाळेचा जीवनपट आठवून गेला - - - -


    मी साधारणतः दोन वर्षांची असेल तेव्हाच माझे वडील वारले होते ."आई तिचा दादा ,सुनील

आणि मी ,असे तिघेच घरी राहत असु. माझा दादा माझ्यापेक्षा ,जवळपास दहा वर्षांनी मोठा 

आहे .घरी गरीब परिस्थिती म्हणून मला सरकारी शाळेत टाकले ,ते ही दोन वर्षे उशिरा .

 आईला जास्त काही कळत नव्हते . शेजारच्या काकू शाळेत घेऊन गेल्या आणि

 माझे नाव शाळेत दाखल झाले .पहिल्या वर्गात , मी सर्वात मोठी होती . शाळेची मला गोडी 

होतीच. त्यामुळे ,रोज न चुकता ,शेजारच्या  मुलींसोबत शाळेत जात होती .शाळा ,

सरकारी असली तरीही छान होती .मोठमोठ्या वर्गखोल्या त्यामुळे मस्त मोकळी हवा नेहमी असायची .,त्या बऱ्यापैकी रंगविलेल्या ,पिण्याच्या पाण्याची सोय केलेली , खूप मुलं होती शाळेत . मला शाळेचे मैदान सर्वात जास्त आवडायचे . प्रशस्त असे मैदान होते .खरं सांगायचं तर 

,मला आमच्या घरापेक्षा शाळेतजास्त करमत होते .घरच्या त्या दोन छोट्या छोट्या खोल्या ,

त्यातील कुबट वास आणि घरासमोर गलिच्छ गटार .त्यापेक्षा शाळा मस्त होती .वर्गात अभ्यास करावा ,मधल्या सुट्टीत ,गरम गरम  खिचडी खावी ,आणि मनसोक्त मैदानावर खेळावे .पुन्हा वर्गात अभ्यास करावा  आणि पाच वाजले की घरी जावे .

    पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मला  फारसे काही आठवत नाही .पण तिसऱ्या 

वर्गात गेली ।आणि मी शाळेतील सर्वांची  लाडकी झाली . अभ्यासात हुशार होती .

त्यामुळे शाळेत साजऱ्याहोणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग आयचाच .शाळेत प्रत्येकथोर नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथी  साजरी होत होती .त्यांच्याविषयी भाषण रंजना मॅडम लिहून देत ,ते मी अवघ्या अर्ध्या  तासात पाठ करत होती .मॅडम माझ्यावर खुश होऊन मला चॉकलेट, नाहीतर पेन्सिल कधी पेन देत होत्या . एकदा सव्वीस जानेवारीला माझे भाषण ऐकून प्रमुख पाहुण्यांनी मला पन्नास  रुपये बक्षीस दिले .मी इतकी खुश झाली की ,ते  रुपये मी किती दिवस जपून ठेवले होते ,त्याना मी सकाळ संध्याकाळ बघत होती  .मॅडम कामात असल्या की ,मला त्या वर्ग सांभाळायला लावायच्या .मी इतर मुलांपेक्षा मोठी असल्यामुळे वर्गातील सर्व मुलं ,मुली माझं।ऐकत .त्यामुळे मी ,थोडीशी अहंकारी बनली होती . मॅडमच्या ते लक्षात आले होते .त्या म्हणत

,"राणी ,हुशारीला ,नम्रतेची जोड असली तरच  माणसाची किंमत होते ."

   मी मॅडम समोर खुप गुणी असल्या सारखी वागायची आणि त्यांच्या मागे बॉसिंग करायची . मैदानावर मी म्हणेल तोच खेळ खेळावा लागे . माझे कोणी ऐकले नाही तर मी त्याला आमच्यात

खेळायला येऊ देत नसे .वर्गात मला नेहमी पहिल्या नंबरवर बसायला आवडायचे .खिचडी खायला 

मला पहिल्यांदा खिचडी हवी असायची . एखाद्यावेळी मला उशीर झाला तर मुली मला 

जागा करून देत .शाळेतील खिचडी खाऊन  खाऊन मी अंगाने चंगलीच भरली होती .मला 

शाळा इतकीआवडू लागली होती की, सुट्टीच्या  दिवशी मला घरी अजिबात करमत नव्हते ,

म्हणून मी मॅडमला.म्हटले ,


"मॅडम कशाला सुट्टी देता शाळेला ?आपली शाळा रविवारी सुध्दा भरवत जा ना ? मी येत जाईल .

आपल्या वर्गातील बाकी मुलींना सुध्दा सांगितले, की त्याही येत जातील ."

   मॅडम काय उत्तर देतात ,याची मला उत्सुकता होती पण त्या काहीच बोलल्या नाहीत .माझ्या

केसांवरून मायेने हात फिरवून मला म्हणाल्या, "जा ,खेळायला ,मला काम करू दे ."

  चौथीत असतांनाची गोष्ट .आमच्या रंजना टिचर सुट्टीवर होत्या . निलेश सरांकडे आमचा वर्ग शिफ्ट

झाला .आमच्या वर्गाला काम देऊन ,सर त्यांच्या वर्गात गेले. मला म्हणाले ,

"राणी मुलांचा अभ्यास झाला की चेक कर .मी

येतोच थोड्या वेळाने ."


 मला दादागिरी करायची मस्त संधी मिळाली होती .माझ्या वर्गातील सौरभ ,जरा जास्तच वरचढ झाला होता .कधी कधी तो ,मुलींना मुलांना माझ्या विरुध्द भडकून देत होता. सर्व अभ्यास करीत होती . अभ्यास झाल्यावर, माझ्याकडे चेक करायला आणत होती .सौरभ अभ्यास घेऊन आला .त्याचे फक्त एकच ऊत्तर चुकले होते .मला असुरी आनंद झाला . मी म्हणाले "तुझे उत्तर चुकले , चल हात समोर कर ."


त्याला वाटले ,एक तर छडी खायची आहे .मी त्याचा बदला घ्यायचा म्हणून जोरात छडी मारली .

तो" आई गं "करत जागेवर बसला .काही वेळाने त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले .मला वाटले

तो नाटकं करतो आहे .सर वर्गात आले .सौरभने सरांकडे माझी तक्रार केली . सरांनी त्याचा हात

बघितला .तो चंगलाच सुजला होता .ते बघून माझा मी मनातून खूप घाबरली होती .बघता बघता ही

बातमी सर्व शाळेत पसरली .प्रत्येकजण माझ्याकडे संशयाने आणि तिरस्काराने बघू 

लागले .त्या दिवशी मला शाळेतून पहिल्यांदा पळून जावेसे वाटत होते .सरांनी सैराभला 

गाडीवर.बसविले आणि दवाखान्यात नेलें . आमच्या शाळेत.सर्वच मुले गरीबांची असल्यामुळे ,शाळेत कोणत्याही विद्यार्थ्यांला काहीही झाले तरी शाळेतील शिक्षकच

त्या विद्यार्थ्यांचा दवाखान्याचा खर्च करत असत .दुसऱ्या दिवशी आमच्या रंजना मॅडम शाळेत 

आल्या .त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली ."तुला ,जास्तीची शिंगे फुटली आहेत राणी .

तुला कोणी मारले असते असे तर - -? किती त्रास होत आहे सौरभला याची कल्पना आहे का तुला ?"


मॅडमची बोलणी ,खाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती .नशीब सौरभचे आई वडील खूप गरीब

असल्यामुळे ते ,शाळेत भांडत आले नाहीत . काही दिवसात सौरभ ठिक होऊन शाळेत आला .

तेव्हापासून मी माझी दादागिरी कमी केली .

    

  पाचव्या वर्गात ,माझ्या वर्गातील अनेक मुलं, मुली दुसऱ्या शाळेत गेल्या .माझ्या आईने आणि

दादाने मला ,जुन्याच शाळेत ठेवायचा निर्णय घेतला .आता आमच्या वर्गात अर्धीच मुलं उरली

होती .रंजना मॅडम बदलून आता ,राधा मॅडम क्लास टिचर झाल्या होत्या .त्या रंजना मॅडम

 पेक्षा खूपच स्ट्रिक होत्या .पण मला कधी  रागवत नव्हत्या . पाचवी ,सहावीत मी अनेक कार्यक्रमात.भाग घेऊन शाळेसाठी बक्षिसे  मिळवली होती ..याच दरम्यान माझ्या दादाचे

 लग्न झाले होते ..आमच्या मोहल्ल्यातील ,पूजला त्याने पळवून आणले होते .मला वाटते पूजा वहिनी ,खूप.गर्विष्ठ असेल .पण पूजा वहिनी स्वभावाने खूपच.चांगली होती .वहिनीचे आणि 

माझे छान जमायचे .

    सातवीत गेल्यावर माझी मैत्री ,ज्यूली सोबत झाली .ती आमच्या समोरच्या गल्लीत राहत होती .

ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती.जशी मला शाळा प्रिय होती तशीच आता ज्यूली प्रिय झाली होती . तिने बॉय कट केला होता. नेहमी  मुलांसारखे कपडे घालायची .कोणालाच जुमानत नव्हती .शाळेत तिचे फक्त नाव दाखलहोते पण शाळेत कधी जात नव्हती .टपोरी पोरांसोबत ती ,नेहमी फिरायची .शाळेतून आली की ,मी सरळ तिच्या घरी जायची . तिचे ते , स्टायलिश राहणे ,मुलांसोबत बिनधास्त बोलणे,

शिव्या देणे ,याचे मला फ़ार आकर्षण वाटत होते . तिच्या ग्रुप मधील आदित्य सोबत माझी ओळख

झाली .तो पण तिच्या सारखाच ,शाळेत न जाणारा . तो बरेचदा मझ्याकडे चोरून बघायचा .याच 

काळात आला सैराट ,सिनेमा - - ! आदित्य मला बघून मुद्दाम ,सैराटची गाणे म्हणायचा,


अलगुज वाजे नभात - - -

भलतंच झालंय आज


  आमच्या गल्लीतील मुलं आम्हाला अर्चि , परशा म्हणून चिडवत होती .मला ते ऐकून, छान वाटत होते. त्याला माझी शाळा माहीत झाली होती .मधल्या सुट्टीत तो शाळेच्या बाहेर चकरा मारायचा .तो आला की ,मी मुद्दाम ,शाळेच्या गेटच्या बाहेर जात होती .हळूहळू ,आमची चर्चा शाळेत होत होती .का कुणास ठाऊक - - ? या काळात ,मी शाळेत जास्तच मस्ती करत

होती .जोरात आवाज करणे ,डेस्क ,बेंच  वाजविणे,शिक्षकांना उलट उत्तरे देणे , असे बेपर्वा वागणे सुरू झाले .माझे बघुन इतर ,मुलीही तशाच वागत .एक दिवस ,शाळेतील ,झाडावर  आम्ही चढलो आणि नेमकी फांदी तुटली . कोण चढले झाडावर ? याची चर्चा झाली . रेखाचे नाव ,समोर आले . मॅडमनी रेखाला बोलावले, "रेखा ,सातव्या वर्गातील ,मुली ना तुम्ही ? तुम्ही शाळेतील इतर मुलींना ,वळण लावावे

तर ,तुम्हीच बेशिस्तीने वागता - - ?" रेखा काही न बोलता ,मान खाली घालून उभी

होती .मॅडम तिच्यावर आणखी चिडल्या . तशी ती म्हणाली ,

"मॅडम ,तुम्ही फक्त आम्हाला बोलता - -? ती राणी तर खूप मस्त्या करते .तिचं साऱ्या लेकराईले बयकून देते ,तिला नाही काही म्हणत ."


    हळूहळू माझ्या विरुद्धच्या तक्रारी वाढत होत्या .पण मी कशालाच जुमानत नव्हती .राधा मॅडमनी मला खूप समजावले ,की राणी तू हुशार आहेस .विनाकारण तुझी एनर्जी ,मस्तीत घालवू नकोस .चांगली शिक .अशाने तुझे अभ्यासातील लक्ष कमी होईल .तुझे शिक्षण थांबेल .पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते .

    एक दिवस ,आदित्यने ,एक चिठ्ठी ,पाठविली. त्यात त्याचा मोबाइल नंबर होता .मग काय ?

रोज ,एक रुपया ,डब्ब्यात टाकून त्याला फोन करत.होती .माझ्या जवळ पैसे नसले की ,लहान मुलींना.दाटावून ,त्यांचे पैसे घेत होती .आदित्य आणि माझी गोष्ट ,राधा मॅडमला कळली .

मी त्याला फोन.करते ,चिठ्ठ्या पाठविते ,हे पण कळले .त्या रेखाने चुगली लावली होती. त्यांनी मला पुन्हा समजावले .राधा मॅडमच्या डोक्याला मी एक खूप मोठा संताप झाली होती .

एक दिवस.मधल्या सुट्टीत ,मी आदित्यला फोन करून आली. मॅडम व्हरांड्यात उभ्या होत्या .त्यांना बघून न बघितल्या सारखे करून मी पुढे निघाली .

राधा मॅडमनी आवाज दिला ,

"राणी इकडे ये ."  मी गेली .

"कुठे गेली होतीस - ? "दरडावून मॅडमनी विचारले

"मधली सुट्टी आहे ,बाहेर गेली होती .चॉकलेट आणायला ."मी खोटं बोलली .

माझ्या खोट बोलण्याचा मॅडमला भयंकर संताप आला .

"खरं ,सांग राणी - - ! कुठे गेली होतीस - - ?" मॅडम

मलाही राग आला होता .माझे आणि मॅडमचे काय सुरू आहे ,हे बघण्यासाठी बरीच मुलं आजूबाजूला जमली होती .त्यांच्या समोर मला, माझ्या इज्जतचा कचरा होऊ द्ययाचा नव्हता.

म्हणून मी म्हणाले , "तुम्हाला काय करायचे ? मधली सुट्टी आहे ,मी कुठेही जाईल ."

  मी असे म्हणताच मॅडमनी सनकन एक माझ्या गालात मारली . त्याचा आवाज ऐकून आणखी

मुलं जमा झाली .मग मीही चांगली चिडली . मॅडमला काही काही बोलू लागली .तसे मॅडमनी

माझे केस पकडून ,पुन्हा एक ठेवून दिली .त्या दुसऱ्या ,थप्पडणे माझे डोळे उघडले .मी रडतच

वर्गात गेली .भयंकर राग डोक्यात होता .मला आजपर्यंत कोणीच मारले नव्हते .घरात मी सर्वांची लाडकी होती .शाळेतही मी कधी मार  खाल्ला नव्हता .थोड्या वेळाने मला ऑफिस  मध्ये बोलवण्यात आले .शाळा सर्व शांत झाली होती .सर्व मुलं वर्गात होती . मी शाळेच्या  ऑफिस मध्ये गेली .तिथे आदित्य होता .

हा इथे कसा - -? त्याला पाहून मला नवलच वाटले .आणखी दोन मॅडम आणि सर

तिथे होते .

"राणी ,हा तुला छळतो ना - - ?"निलेश सर  मी काहीही न बोलता खाली मान घालून उभी होती .


"आम्ही ,याची सर्व कुंडली काढली आहे .हा आपल्या परीसरातील दोन चार शाळेच्या पुढे

उभा राहतोआणि मुलींना छेडतो .काय रे मजनू ?बरोबर आहे की नाही - ?" 

मुख्याध्यापक


"नाही सर ,मी कोणाला छेडत नाही ."आदित्य


निलेश सरांनी त्याची कॉलर पकडली, आणि ओरडले , "खरं सांगतेस ,की नाही .नाहीतर तुझ्या विरुद्ध

पुरावे गोळा करून ,पोलिसांना द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही ."

  पोलिसांचे नाव ऐकताच आदित्य घाबरला .पटापटा बोलु लागला ,

"हो सर ,तुम्ही म्हणता ते खरं आहे .मी राणी, काजल ,रेणू या सर्व मुलींना ,छेडले आहे ."

  हे ऐकून मला खरे काय ते कळले .मी वर्गात जायला निघाली .


तसे राधा मॅडमनी मला  अडविले .आता पुढे काय घडणार ? याची भीती वाटू लागली . "आता यापुढे जर ,तू शाळेच्या आजूबाजूला जरी दिसला तरी याद राख .राणीला रस्त्यात कुठेही गाठायचे नाही .दोन पैसे कमवायची अक्कल नाही अन चालला मजनू ,बनुन  फिरायला ."मुख्याध्यापक

   आदित्य खाली मान घालून निघून गेला . शाळा सुटल्यावर माझा दादा मला घ्यायला आला .दादा आणि राधा मॅडम बराच वेळ बोलत होते .त्यांचे काय बोलणे झाले ,ते मला कळले  नाही .फक्त जातांना दादा म्हणाला, "मॅडम ,तुम्ही जे ,केले ते योग्यच केले ." मला वाटले घरी गेल्यावर दादा मला खूप

रागवेल पण तो काहीच बोलला नाही .नेहमी सारखा नॉर्मल वागला .दुसऱ्या दिवशी मला

शाळेत जायची अजिबात इच्छा नव्हती .पण  दादाने मला घरी राहू दिले नाही .तो रोज मला

शाळेत ,सोडायचा आणि घ्यायला सुध्दा यायचा . राधा मॅडमशी मी बोलणे अजिबात सोडले होते .

आठ दिवस गेले .नंतर एक दिवस चार वाजता मुली मैदानावर लंगडी खेळत होत्या .मी बाजूला

उभी होती .अचानक राधा मॅडम तिथे आल्या.

मुलींना म्हणाल्या , "चला आज मी पण खेळते ,तुमच्या सोबत ."

मुली एकदम खुश झाल्या . मॅडमनी साडी थोडी वर खोचली . त्या धावू लागल्या .दहा मिनिटे झाली .तरीही मॅडम आऊट होत ,नव्हत्या .सर्व मुली थकल्या होत्या .शेवटी मॅडम म्हणाल्या ,


"तुमच्या आठव्या वर्गातील एकही मुलगी मला आऊट करू शकत नाही का ?"

   मॅडमनी असे म्हणताच ,मी मैदानात उतरली . अवघ्या दोन मिनिटात मॅडमला आऊट केले . मुली , "राणी ,राणी "म्हणून ओरडू लागल्या . माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आले .सर्व मुली मला बिलगल्या . मॅडम काम फत्ते झाले म्हणून निघून गेल्या .त्यानंतर मॅडमची आणि माझी चांगलीच गट्टी झाली .आठवा वर्ग सोडून दुसऱ्या शाळेत गेली ,तेव्हा मॅडमच्या गळ्यात पडून मी अक्षरशः रडली होती .शाळा सोडली तरीही मी राधा मॅडमच्या संपर्कात होतीच .पुढे त्यांच्याच सल्ल्याने मी नर्सिंग चा कोर्स केला .


   आजही मला माझ्या शाळेची आठवण आली की ,शाळेविषयी माझा ऊर अभिमानाने दाटून

येतो .शाळेमुळे आणि शाळेतील शिक्षकांमुळे माझे जीवन सावरले गेले .


Rate this content
Log in