अन् मला हसू आले
अन् मला हसू आले
लॉकडाऊनमध्ये आम्ही चौघे म्हणजे माझा नातू अनुराग, सून गौरी, मी आणि माझे मिस्टर रोज दुपारी कॅरम खेळतो.
खेळात मजा येण्याचे कारण अनुरागला छोट्या छोट्या गोष्टींनी हसू येते. त्याला साथ दिली की तो अजून हसतो. दिवस हसत-खेळत जातो.
माझे मिस्टर सोंगटी जावी म्हणून जोरात मारतात, त्याने सोंगटी जाते पण ड्यू होतो. मी लहानपणी डिव डिव डिव डिव णिव णिव णिव णिव असे गाऊन म्हटल्यावर आणि मला व अनुरागला एकदम हसू येते व त्या आनंदातच आम्ही त्यांची सोंगटी काढतो.
जवळची सोंगटी घेताना माझे मिस्टर कोपर आत जाईपर्यंत ढकलून सोंगटी घेतात. तेव्हा ओ ढकलम ओ ढकलम असे मी म्हटल्यावर मी व अनुराग यांच्याकडे बघून पोट दुखेपर्यंत हसतो.
आख्खा दिवस घरात काढायचा असतो. या विनोदांनी हसण्याने घरातले वातावरण हसरे खेळकर व आनंदी राहाते...
