आयुष्यातील सार्थ निवड
आयुष्यातील सार्थ निवड


मी नेहमी नवऱ्याला गमतीने म्हणते की माझी निवड चुकली पण तुमची निवड छान आहे. त्याच्यातला गर्भितार्थ त्याला कळतो पण तो प्रतिक्रिया देत नाही. असो पण सत्तावीस वर्षांपूर्वी मी केलेली निवड अत्यंत योग्य आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.
साधारणता नव्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर, एकमेकां मधले गुणदोष दिसू लागतात. मुलगी माहेरचं घरदार सोडून येते पण, तिच्या सवयी तिचे गुणदोष बरोबर घेऊन येते . त्यानंतर त्या चांगल्या-वाईट सवयींवर टीकाटिप्पणी होते .घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच पण त्याचा आवाज बाहेर न जाऊ देण हे दोघांचं काम.
आमची देखील भरपूर भांडणं व्हायची, अगदी बाहेर आवाज जायचा. पण आमचे भांडण कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त एक दिवस टीकायचे. मी किती वेळा रागाने तुमच्यापासून डिवोर्स घेईन असे म्हणत असे. पण त्यांनी कधीच असे म्हटले नाही . आमच्या घरात कायच माझे स्थान बरोबरीचे राहिले, छोटे-मोठे निर्णय घेताना दोघांनी मिळून घेतले .सुखा दुखात एकमेकांना साथ दिली. फसलेल्या निर्णयाच खापर कधी एकमेकांवर फोडलं नाही .
मधली दहा वर्षे मुलांच्या संगोपनामध्ये गेली. मुलांची ॲडजस्टमेंट करण्यासाठी सततच आम्ही अपोजिट ड्युटी घेत राहिलो. आता तर माझ्या ड्युटी चे ठिकाण लांब असल्याने घरातील सर्व जबाबदाऱ्या तेच पाहतात. घरामध्ये काय आहे, काय नाही, काय संपले ,काय आणायचे हे सारे त्यांनाच माहीत असतं.
त्यांच्या जीवावरच मी माझे छंद सुखनैव पार पाडते .कथा कविता या विषयामध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही. परंतु बायकोचे कौतुक मात्र आहे. त्यामुळे माझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते मला स्कूटर वरती नेऊन सोडतात परत न्यायला येतात. माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी पुष्कळ मेहनत घेतली आम्हा दोघांचे अजून एक कॉमन फॅक्टर आहे. तो म्हणजे भटकणे, अर्थात पर्यटन प्रवासाला जाताना प्रवासाची संपूर्ण बॅग भरणे .छोट्या-मोठ्या गोष्टींची आठवण करून देणे प्रवासात पण जिथे मुक्कामी राहू तेथे उद्या काय कपडे घालावयाचे हे पण ते बरोबर बाजूला काढून ठेवतात. म्हणजे प्रवासामध्ये मी एखाद्या लहान बाळसारखी असते. आमच्यातील भांडण हा प्रकार आता केव्हाच मागे पडल आहे. आता 27 वर्षात मुरलेलं लोणचं झाल आहे .आता फक्त एकमेकांची काळजी वाहणारा जोडपं ,असेच आम्ही झालो आहोत आणि गेल्या सत्तावीस वर्षात त्यांच्याशी लग्न केले आता मला कधीच पश्चाताप झाला नाही उलट ती माझी सार्थ निवड आहे