आठवणीतले चार दिवस
आठवणीतले चार दिवस


आठवणीतले चार दिवस आज तुला पहिल्यांदा पाहिलं. खुप खुश झालो तुला बघून पहिल्यांदा नजरेला नजर भिडली तेव्हाच कळलं की आपल्यात काहीतरी आहे. पण कधी वाटलं नव्हतं की अस आठवणीत ते शब्द ठेवावे लागतील.
मला नेहमी वाटायचं की मजल्यावर जो कोणी प्रेम करेल त्याला मी प्रेमा शिवाय खूप काही देईन पण कधी असा विचार नाही केला की मला सुद्धा प्रेमा सोबत खूप काही मिळेल पण या मध्ये एक गोष्ट राहिली तुम्हाला माहित आहे का ती???

या मध्ये खर प्रेम राहील एकमेकांना देणारे वादे राहिले आणि खर म्हणजे एकमेकांना दिलेली वचने राहिली. जर एखादा व्यक्ती प्रेम करतो तर तो या सर्व गोष्टी करतो. पण मी अस काही केलं नाही कारण हे सर्व घडण्या आधीच जर ती व्यक्ती माझ्या पासून लांब गेली असेल ते मी काय करणार? त्यासाठी आणि आपण कधी तेवढ्या लांबचा विचार नाही करत की कोण माझ्या जवळ राहणार आहे. कोण नाही राहणार यावर आपण कधी विचार नाही करत मुळातच.
तो व्यक्ती जोवर आपल्या सोबत आहे तोवर आण, त्याच्यासोबत प्रेमाने राहतो खरी गोष्ट तेव्हा कळते जेव्हा प्रसंग निर्माण होतो. आज ती माझ्या सोबत नाही परंतु ती जेव्हा सोबत होती तेव्हा कधी मी तिला दोष नाही. आज तिला दोष देऊन काय प्राप्त होणार? माणसाने आपल्या कडे जे आहे त्यात जास्त सुखी राहावं, जे नाही त्याची खन्त करत बसण्यात निव्वळ मूर्खपणा आहे. तिने आयुश्यात सुखी राहावं हीच प्रार्थना.
धन्यवाद आपला अमूल्य वेळ देऊन कथा वाचली त्याबद्दल आपले आभार.