Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Mohini Limaye

Others


1  

Mohini Limaye

Others


आठवणीतील शांताबाई

आठवणीतील शांताबाई

3 mins 647 3 mins 647

महाराष्ट्र अनेक नामवंत लेखक,साहित्यिक,समीक्षक,कवी,कवयित्री ह्यांचा वारसा लाभलेली ह्यांच्या लेखनाने पावन झालेली भुमी .. पु ल देशपांडे, रणजित देसाई, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, नामदेव ढसाळ, दुर्गा भागवत, ईंदिरा संत, विजया वाड, पद्मा गोळे, किती किती म्हणून नावे घ्यावीत सर्वच आपल्या कार्याने प्रतिभावंत आपाआपल्या जागेवर अगदी चपखल बसलेले .. पण मला मनापासून भावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या शांताबाई शेळके .. साधी रहाणी उच्च विचाराचे वाहते झरे कुठे असतील तर ते शांताबाईंच्या हृदयात .. साधी सरळ नऊवारी साडी डोक्यावर पदर डोळ्यावर चष्मा असणारी नावाप्रमाणेच शांत मूर्ती .. पण मनात मात्र साहित्याची खाण वसलेली .. प्रचंड कर्तुत्ववान स्त्री कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून कार्य करत असतानाच साहित्य लेखन करणे आणि तेही ईतके उत्कृष्ट की त्यांची गीते अलगद आपल्या मनात तरळुन जातात .. आज मला त्याबद्दलच थोडेसे लिहावेसे वाटते आहे ..


गणराज रंगी नाचतो .. काय गीत आहे हे जे कानावर पडले की साक्षात गजाननाची प्रसंन्न मुर्ती डोळ्यासमोर नाही उभी राहिली तर नवलच .. आज दुर्दैवाने त्या आपल्यात नाहीत पण त्यांचे प्रत्येक गीत आपली एक जागा निस्चित करुन गेलेले आहे गणराज रंगी असो किंवा शालु हिरवा पाचुनी भरवा असो .. गीत लेखन शब्दांची मांडणी अगदी चपखल .. आपण त्यांच्याशी जोडले गेलेले आहोत ते तरतरीत मनाला भावणार्या शब्द गुंफणीने किती हे प्रसंन्न हसतमुख व्यक्तिमत्त्व .. की डोळ्यासमोर येते त्यांचेच गीत जय शारदे वाघेश्वरी .. शांताबाईचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील ईंदापुर येथे शेळके ह्यांच्या भव्य वाड्यात झालेला .. पहा कसा योगा योग आहे आत्ताच ऑक्टोबर महिन्यात त्यांचा जन्मदिवस होत आहे आणि आपण त्यांचे स्मरण करीत आहोत .. ह्याच शेळक्यांच्या वाड्यात गेले शांताबाईंचे बालपण आणि आठवले आई ग बघ ना कसा हा दादा .. शेळक्यांच्या वाड्याने त्यांना काय दिल हे आठवल्यावर त्या म्हणत असत की मला त्या वाड्यान माझ्या जातीची ओळख करुन दिली .. लहानपणीच राजवर्खी चुडा घालण्याची मनोमन हौस होती बालवयात रान बाभुळीची फुल हळुच कानात घातलेली ऊभी करवंडा साडी घट्ट नेसलेली कसुन आणि वृंदावनापाशी ऊगी राहिले बसुन .. त्या सांगत होत्या जुन्या आजोळीच्या घराची पडझड झालेली .. ओटी,अंगण,पडवी,काहीही राहिले ना धड हरवले बालवय खोल जिव्हारी लागलेले .. कुठे मुकाट तेथुनी मन शिणले भागलेले .. क्षणभर मागे वळुनी पाहिले आणि समोर दिसलेल्या वाटेकडे पाहुन आठवले ..


ही वाट दूर जाते .. तोडे, वाळे, साखळ्या, तोरड्या, हे पायात घालावयाचे दागिने ओळीने पायात घालायला मिळालेले .. ९/१० वर्षाची झाल्यावर मात्र ही बाळलेणी अंगावरुन काढुन घेण्यात आली पायात सतत काहीतरी घालायची सवय झाल्यामुळे मोकळे पाय बरे वाटेनात .. असे शांताबाईंचे बालपण त्यांची खूप छान बालगीते बडबड गीतेही आहेत बर .. मला आत्ता मात्र आठवत आहे .. किलबिल किलबिल पक्षी बोलती .. आपल्या आजोळाबद्दल भरभरून सांगताना त्यांचे मन अगदी हुरळुन जात असे .. त्या सांगत माझ्या अंगावरच्या साडीची जागा आता परकर पोलक्याने घेतली होती .. नदीचे पाणी पायाला वेटाळुन पुढे जात होते .. धुणी धुणार्या बायकांनी पाण्यात पाण्यात खळखळणार्या कपड्यांना लावलेल्या साबणाचा आणि पाण्यातल्या माश्यांचा असा मिळुन एक वास येत होता आणि माझे लक्ष अवचित निळ्याशार आभाळाकडे सरकत होते आणि मनात येत होते .. निळ्या आभाळी काररवेळी .. हे सर्व शांताबाई अगदी जुन्या आठवणींमधे रमुन सांगत होत्या .. प्रतिभावंत कवयित्री तर त्या होत्याच त्या सोबतच प्राध्यापिका,लेखिका,संगीतकार,बालसाहित्य लेखिका आणि पत्रकारही होत्या फिल्म प्रमाणपत्र मंडळाच्या तसेच राज्य नाट्य निरिक्षण मंडळाच्या सदस्याही होत्या मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी कर्तुत्ववान स्त्री ..


यावरुन आठवते शुर आम्ही सरदार .. त्यांचे अनेक काव्यसंग्रह ललितलेख अनुवाद ही प्रकाशने प्रसिद्ध आहेत .. तसेच अनेक पुरस्कारांनी जसे जसे त्यांना सन्मानित केले गेले तसेच त्यांच्या नावानेही अनेक पुरस्कार दिले जात आहेत .. वर्षानुवर्षं गेली संसाराचा सराव झाला नवाकोरा कडक पोत एक मऊपण त्याला पैठणीच्या घडीघडीतुन अवघे आयुष्य उलगडत गेले आणि माझ्या आजिला सौभाग्य मरण आले हे सांगत त्यांना आठवते जिवलगा राहिले दुर घर माझे .. आले ह्या पानात सोनिया उन्हात साद ओली पाखरांची ओढ जागे पावसाची डोहाळे ह्या मातीतील सुर बोले थेंबातील असे हे आपला निराळाच ठसा उमटवण्याचे कौशल्य ६ जुन २००२ रोजी अनेक कविता लेख आणि सुमधुर गीतांचा ठेवा आपल्यासाठी मागे ठेवुन अनंतात शांत सुमन विलीन झाले .. शब्दही अपुरे पडतील लिहिता लिहिता पाने संपतील पण शांताबाईचे लेखन कधीही संपणार नाही .. आणि आपण विसरु शकणार नाही .. पैल तो गे काऊ कोकताहे ..


Rate this content
Log in