आशा आई
आशा आई
"चिऊ ताई ऊठा ! शाळेत नाही का जायच ,चला चला आवरा लवकर !" आशा गायत्रीला शाळेत जाण्यासाठी ऊठवत होती.
रोजचा दिनक्रम !गायत्रीला उठवायच ,आंघोळ घालायची , दुधचहा करून पाजायचा ,डब्बा करून द्यायचा.तिला रिक्षात बसवायच आणि ती शाळेत गेली की मग आशा कामावर यायची .
ऐक दिवस गायत्रीचा फोन आला ,"आशा आई आहे का ?पाठवा "
सुमित्रा बाईंनी आशाला निरोप दिला,"आशा तुझ्या घरून फोन आला होता ,तुला बोलवलय घरी."
आशा ,"हो का ! कोण बोलत होतं?"
सुमित्रा बाई,"अग कुणि तरी छोटी पोर होती बहुतेक ,कोण आहे ?"
आशा ,"गयू असेल ,गायत्री ,माझ्या बहिणीची मुलगी,"
सुमित्रा बाई ,"अच्छा मग ति तुला आई का म्हणते ?"
आशा ,"बाई पोरगी तिला कळत तशी माझ्याच जवळ आहे . तिचा कपडालत्ता,हौसमौज मीच करते.बाप आईला शिवीगाळ करतो ,घरात सारखी भांडण होतात. ति तिकडे जायचच नाही म्हणते.तिची आई आली तरी लेकरू माझ्याच मागे.ऐकदा दुस-या बहिणीची पोर तिला चिडवायला लागली,म्हटली आमची आई बघ आमचे किती लाड करते.आम्हाला नवीन नवीन कपडे घेते ,आवडीच खायला करते .तु तर तुझ्या आई जवळ पण नाही राहत, आम्ही तर आमच्या आई जवळ राहतो . मग गयु म्हटली मी पण राहतेच की आई जवळ ,माझ्या आशा आई जवळ,माझ्या मांडीवर येऊन बसली आणि गळ्यात पडत म्हटली हिच आहे माझी आशा आई !,तिच मला कपडे घेते ,माझ्या आवडीच खायला करते,माझ्या शाळेतही तिच येते. मला दवाखान्यात तिच तर नेते,माझे सगळे लाड करते माझी आशा आई ,मग काय लेकरान माझी कुसच भरली अस म्हणा नाही तर मला कुणि आई म्हटल असत.नव-यानं टाकुन दिलेली बाई मी .माझी आई अन मी गयुची आई येवढीच काय ती नाती माझ्या जीवनात --"
सुमित्रा बाईनां ही मनोमन वाटल तो ऐका हातन काही घेतो तस दुय-या हातानं देतो ही ,तसच त्यानं आशाला आईपण दिलय.
