STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

आर्ची

आर्ची

1 min
267

आर्ची ही एक बिनधास्त कॉलेज मध्ये शिकणारी मुलगी असते. ती बुलेट चालवते, विहिरीत पोहते. ती इतकी बिनधास्त असते की कुणालाच घाबरत नाही. तिच्या कॉलेज मध्ये तिची रॅगिंग घेण्याची कुणाची हिम्मत नसते. 


कॉलेज एका खुप शांत मुलीची एक मुलगा रॅगिंग घेत असतो. तो तिला झाडाचे पान देतो आणि म्हणतो हे पान घे आणि सरांना दे. खबरदार त्यांना मी द्यायला सांगितले असे सांगितले तर. ती मुलगी खुप घाबरते रडकुंडी येते आर्ची हे सर्व बघते. ती तिथे जाते आणि तिला म्हणते ठीक आहे चल आपण देऊ आणि ह्या मुलाचे नाव सांगून ह्याला कॉलेज मधून काढून टाकायला सांगू. तो मुलगा घाबरतो आणि दोघींची माफी मागतो आता परत मी कुणाचीच रॅगिंग घेणार नाही मला माफ करा. त्यावर आर्ची म्हणते एव्हडया सहजा सहजी तुला माफ करणार नाही. तुला त्या झाडाची पाने उचलावे लागणार. ते झाड असे होते झाडाची पाने खुप पडतात. पण आर्ची काही ऐकत नाही अश्या प्रकारे त्याच्या कडून पाने कॉलेज संपे पर्यंत उचलून त्याची खोड मोडते.. आणि नंतर जेव्हा त्याला आर्ची दिसते तो खुप घाबरून राहतो.


Rate this content
Log in