Annapurna Sarvgod

Children Stories Inspirational Children

3.3  

Annapurna Sarvgod

Children Stories Inspirational Children

आज्जीची एक गोष्ट

आज्जीची एक गोष्ट

2 mins
753


      सुमनच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं.ती तीच्या वैवाहिक जीवनात खूप खुश होती.ती गरोदर होती.त्यामुळे ती रोज काहितरी नवीन पदार्थ करून खायची. तिने माहेरुन येताना तीच्या सोबत एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आली होती. त्या पिल्याचं नाव तिनं रानी असं ठेवलं होतं. रानी सुमनला खूप मनायची. सुमनला ही तिचा खूप लळा लागला होता. सुमन गरोदर होती. तिला तिच्या आईची खूप आठवण यायची. त्यामुळे तिची आई काही दिवस तिच्याकडे राहायला आली. ती सुमनची काळजी घेऊ लागली तिला काय हवं नको ते बघत होती.


      काही दिवसांनी रानीपण गरोदर रहिली. पण सुमनचं  आता तिच्याकडे दुर्लक्ष होत होते. रानी एके दिवशी दारात बसलेली होती. तीला खूप भूूूक लाागली होती. तेवढ्यात सुमन आली आणि तिनं उरलेलं जेवण गटारीत टाकलं. रानीला ह्याचा खूप राग आला. जनावर आहे म्हणून  काय झालंं तिचाही जीव आहे. रागाच्या भरात तिनं सुमनला श्राप दिला. ती म्हणाली, मी कुत्री असल्यामुळे तू माझ्या शी अशी वागलीस ना अता मी तुला श्राप देते की माझ्यासारखे मूल तुुझ्या पोटी जन्माला यावं आणि माझ्यापोटी तुझी मूलं यावी .

       

       काही  दिवसांनी सुमनची डिलीवरी झाली. बघितलं तर काय तिच्या पोटी दोन कुत्र्याची पिल्लं झाली. सुमनला काही कळलंच नाही. ती शांतपणे बघत बसली. तिच्या लक्षात आलं की ती रानीबरोबर खूप चुकीची वागली होती. त्यामुळे देवाने तिला ही शिक्षा दिली होती. तिला कळून चुकले  की ती किती

चुकीची वागली. तिने पुन्हा रााणीची माफी मागितली.


       इकडे रानीनेे दोन सुंदर मुलींना जन्म दिला. ती तिच्या मुलींची खूप छान काळजी घ्यायची. ती तिच्या मुलींसोबत आनंदात राहात होती. काही दिवसांनी तिच्या मुली मोठ्या झाल्या. तिने तिच्या मुलींना शाळा शिकवली. त्या मुली दिसायला खरंच खूपच सुंदर होत्या. अगदी राजकुमारी सारख्या

दिसायच्या. एक दिवस दोघी जणी फिरायला गेल्या. फिरत असताना अचानक दोन घोडेस्वार तिथे आले. त्यांची नजर या दोन बहिणींवर पडली. ते घोडेस्वार त्या दोघींच्या प्रेमातच पडले. त्या दोघींना घोडयावर बसवून ते घेऊन गेले. जाताना एका मुलीनं विचार केला की आपली आई आता अपल्याला कशी शोधणार?  नंतर तिने एक युक्ती केली. तिच्या आईने तिला एक मोत्याचा हार दिला होता. ती त्यातले एक एक मोती टाकत गेली. ज्या माणसांनी त्यांना उचललं  होतं ते राजा आणि प्रधान होते. त्यांनी त्या मुलींशी लग्न केले आणि सगळे सुखात राहू लागले.


    इथं  रानीला तिच्या मुलीची काळजी वाटू लागली. ती त्यांना शोधू लागली. शोधत ती लांब गेली, समोर काहीतरी  चमकत असलेलं तिला दिसलं तिने ते पाहिलं आणि ओळखले की हा तोच हार आहे जो तिने तिच्या मुलीला दिला होता. ती त्या दिशेनं बघत बघत गेली. तेव्हा तिला कळलं तिच्या मुली खूप

सुखात आहेत आणि त्यांनी लग्न केले आहे. ती तिच्या मुलींचा संसार बघण्यासाठी त्यांच्या घरी गेली.


      ती पहिलं मोठ्या मुलीकडे गेली. ती आता राजाची बायको होती. ती तिच्या आईला पूर्ण विसरली होती. राणी तिच्या दारात गेली. तेव्हा तिने तिला खूप मारलं. काठकाठीने मारली. तेव्हा तेथून रानी निघून गेली. ती तिच्या लहान मुलीकडे गेली. तिने रानीला लगेचच ओळखले. ती रडू लागली रानीलापण

तिला बघून खूप छान वाटलं. दोघी एकमेकांना बघत बसल्या. तिने रानीला खायला खीर केेली. राणीने ती  खाल्ली आणि थोड्या वेळानं तिने जीव सोडला.

तिच्या मुलीनं तिला एका पेटीत ठेवली.  काही दिवसांनी तीने  पेटी उघडून बघितले तर त्यामध्ये हीरे मोती  भरले होते. हे बघून तिच्या डोळ्यांत पाणी आलं.


  तिच्या आईने जाताजाता तिला आशिर्वाद दिला होता. पण मोठ्या मुलीला मात्र गरीबी आली. तिच्या लक्षात आलं की तिने खूप मोठी चूक केली होती. त्यामुळे देवाने तिला इतकी मोठी शिक्षा दिली होती. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चात्तापही झाला. जिने आईची सेवा केली ती खूप सुखात होती. ती दररोज त्या पेटीची पूजा करायची.


Rate this content
Log in