Sarita Sawant Bhosale

Others

1.0  

Sarita Sawant Bhosale

Others

आईचं नवीन वर्ष

आईचं नवीन वर्ष

3 mins
831


     "आई मला हजार रुपये दे आज...पार्टी आहे 31st ची."

 अरे नीरज एवढे कशाला? काय आजकालची तुम्ही मुलं पण.. पैसे अगदी झाडाला लागल्यासारखे या ना त्या पार्टीसाठी पैसे मागत असता... इतकं काय करणार आहात रे... जूनं वर्ष संपतय आणि नवीन सुरू होतंय याच्या नावाखाली खायचं, नाचायच, प्यायचं, धिंगाणा घालायचा आणि सुसाट गाडी चालवून कुठेतरी गाडी ठोकून डोकी फोडून घ्यायची. मागच्या वर्षी झाला ना त्या सुमितचा अपघात असाच. सुरुची मुलाला पार्टीवरून बोलत होती पण बावीस तेवीस वर्षाचा नीरज काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तेवढ्यात वैदेहीने म्हणजे त्याच्या बहिणीनेही आईकडे पार्टीसाठी पैशाची मागणी केली. सुरुचीने डोक्याला हातच मारून घेतला. 


तसं दोघेही आईला म्हणाले तुला आणि आजीला नवीन वर्षाची काही हौस नसतेच का ग? तुमचं New Year नसत का कधी?? वैदेही हसतच आजीला म्हणते "आजी तुमच्यावेळी हे celebration वगैरे होत का ग? तुम्ही केले का New Resolution वगैरे असलं काय कधी?"

    आजी वैदेहीला म्हणते पोरी आमच्यावेळीही नवीन वर्ष येणार म्हणून उत्साह, उत्सुकता असायचीच जशी प्रत्येक सणाला असायची. 

आमच्या वेळच्या पार्टी म्हणजे नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येऊन गप्पा टप्पांची, गाण्यांची बहारदार मैफिल सजायची. नवनवीन हाताने बनवलेल्या पदार्थांची रुचकर मेजवानी असायची. आपल्या माणसांसाठी मनापासून दिलेल्या शुभेच्छा असायच्या...तुमच्या त्या मोबाईल वरून पाठवलेल्या नाही हा समोरासमोर हातात हात देऊन,गळा भेट घेऊन आपुलकीने शुभेच्छाची देवाणघेवाण व्हायची. पुन्हा नक्की भेटू हा संकल्प असायचा..ते खरं celebration असायचं आमचं...मजा यायची😊. 

    सुरुची सासूबाईंच्या म्हणण्याला होकार देत म्हणते ,"हो ना आई...तेच दिवस छान होते पण आता काय गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी अशी गत झाली हल्ली. आणि नीरज आईच नवीन वर्ष,नवीन उत्साह म्हणजे काय रे... ते तर तुमच्या प्रगतीत लपलेलं असतं. मूल जन्माला आलं की तिच्यासाठी नवीन वर्षच सुरू होत. त्याने पहिल्यांदा आई म्हणणं, पहिल्यांदा पाऊल टाकणं, पहिल्यांदा शाळेत जाणं, मुलाच्या प्रगतीपुस्तकावरचा आलेख वाढत जाणं... त्याच्या नोकरीचा पहिला दिवस,त्याचा पहिला पगार...त्याने घेतलेली पहिली साडी..त्याची उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती सगळेच क्षण तिच्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवाती इतकेच उत्साही आणि आनंदमय असतात.

   आपल्या नवऱ्याचं प्रमोशन होणं, नवीन घर घेणं, नवीन गाडीच आगमन होणं... प्रत्येक सणाला परिवाराच्या,मुलांच्या चेहऱ्यावर हसू झळकण... सगळ्यांना एका धाग्यात बांधून ठेवणं... आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजेच तिचं celebration असतं. आजच्या सांजेला हसत निरोप देऊन ती उद्याच्या नवीन पहाटेला हात जोडून माझ्या मुलांना,माझ्या परिवाराला सुखी ठेव हीच प्रार्थना ती नित्यनेमाने करत असते. दिवसामागून दिवस जातात...वर्षामागून वर्ष सरतात पण घराचं सुख या तिच्या संकल्पात काडीमात्र बदल होत नाही.

  तुम्ही मुलं आपल्याच माणसांना घरी सोडून बाहेर पार्टीच्या नावाखाली मस्त एन्जॉय करता...celebration celebration म्हणून त्याचा भपका करता...एन्जॉय करावं की, माझं याला दुमत नाही पण आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा किंवा अतिरेक करू नका इतकंच आमचं म्हणणं. "

  आजी :- नीरज..वैदेही शेवटी आपल्या माणसांसाठी आपल्या हक्कांच्या माणसांसोबत आनंदाचे,सुखाचे, समाधानाचे चार क्षण घालवणे म्हणजेच celebration रे.

   सुरुचीने मुलांना पैसे दिले पण नीरज आणि वैदेहीने बाहेर पार्टीला न जाता ती संध्याकाळ आई,आजी,आजोबा,बाबा,इतर नातेवाईक यांच्यासोबत साजरी केली. पूर्ण परिवाराने खऱ्या अर्थांने celebrate केला तो दिवस. 

    कथा आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच. आपल्या माणसांच्या celebration सोबत सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा😊🙏.

                  


Rate this content
Log in