Rahul Shinde

Others

4.3  

Rahul Shinde

Others

आई

आई

1 min
2.1K


गौरव अतिशय अशक्तपणे अंथरुणावर पडून होता.संपूर्ण अंग ठणकत होते,असह्य होऊन तो मधूनच कण्हत होता.इतक्यात त्याची आई किचनमधून त्याच्या खोलीत आली.

"आता तरी दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेऊन ये.. प्रत्येकवेळी तू आजार अती होईपर्यंत अंगावर काढतोस... थांब,पाय आणि अंग दाबून देते तुझे,बरं वाटेल. " आई तन्मयतेने गौरवची सेवा करू लागली.

"खरंच बरं वाटतंय गं...आपण अंथरुणांवर पडलो की जेवण, औषधं सगळं वेळेत देत आपली सेवा करायला आई आहे, ही जाणीवच अर्धा आजार पळवून लावते बघ..." अशक्तपणातल्या अर्धवट झोपेत तो म्हणाला.

"कौतुक बास हा.."

" तू स्वतः सत्तरीची झालीस तरी अजून पन्नाशीच्या मुलाची लहान मुलासारखी काळजी घेतेस.. कधीकधी भीती वाटते, तू नसल्यावर माझे काय होईल.."

"तू आहेस तोपर्यंत असेन मी तुझी काळजी घ्यायला...." आई ठामपणे म्हणाली.

तिचे हे बोल ऐकून गौरव दचकून पूर्ण जागा झाला... खोलीत तो एकटाच होता. त्याच्या आईचा मृत्यू होऊन ४ वर्ष झाले होते.... त्याचं अंग दुखायचं कितीतरी पटीनं कमी झालं होतं.


Rate this content
Log in