आई
आई


अनेक नात्यातले सर्वात सुंदर आणि निरपेक्ष नाते जे आहे ते आई आणि मुलाचे.. आई सदैव आपल्या मुलांचाच विचार करते..एक स्त्री जेव्हा आई होते. तेव्हा ती स्वतः पेक्षा मुलांचाच विचार करते. आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात टाकते.. त्याचे उदाहरणच द्यायचे झाले तर हिरकणीचे देता येईल.
हिरकणी ही एक गवळीन असते. जी रोज गडावर दूध घेऊन जाऊन विकते. तिला एक तान्हे बाळ असते ते घरी ठेऊन. ती उंच गड चढून जाते व सूर्य मावळायच्या आत घरी येते एक दिवस तिला गडावरून उतरताना खुप उशीर होतो. सूर्य मावळतो. सूर्य मावळल्यावर कुणीही गड उतार करत नाही. कारण सूर्य मावळ्यांवर जंगली जनावराची भिती असते. तेव्हा तिला गडावरचे लोक गड न उतरण्याचा सल्ला देतात.संध्याकाळी पुरुषही गड उतार करण्याची हिम्मत करत नाही असे करतात. पण ती कुणाचेही ऐकत नाही कारण तिला फक्त तिच्या बाळाचीच चिंता असते. तिला चिंता असते तिचे बाळ भुकेले असेल त्याला दूध पाहिजे असेल. ती कुणाचेही काहीही न ऐकता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गड उतार करते.. आहे आणि सर्व गोष्टींचा सामना करून घरी पोहचते आणि घरी पोहचताच बाळाला उचलून त्याचा लाड. त्यातच तिचा पूर्ण थकवा जातो आणि खुप खुश होते. तिची ही कामगिरी पाहून शिवाजी महाराज तिचा सत्कार करतात आणि ज्या गडावरून तिनी गड उतार केला त्याला हिरकणीचा बुरुज म्हणून आजही ओळखल्या जाते..
मुलांना सुसंस्कार देण्याचे कामही आईच करते. शिवाजी महाराज हे जिजाबाईंनी घडविले. जिजाऊ त्यांना लहान पणा पासूनच स्वराज्याचे स्वप्न दाखवायच्या. मुघलांच्या राज्यात शहाजी सेनापती होते तेव्हा जिजाबाई शिवाजी महाराजांना राम, कृष्णाच्या गोष्टी, थोर पुरुष च्या गोष्टी सांगून त्यांच्या त स्वराज्याचे संस्कार रुजविले. आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या सोबतीने वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा गड जिंकला व त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही. व स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले..
अशीही माता असते जी मुलांना घडविण्याचे काम करते.. आई हे मुलाचे पहिले दैवत असते.