Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Neha Khedkar

Others


3.4  

Neha Khedkar

Others


आई..!

आई..!

3 mins 11.9K 3 mins 11.9K

वेगळेपण जपणे ..मला माझ्या आईकडून मिळाले...


"मला माझ्या कडून काय मिळालं...?" ह्या प्रश्नाच उत्तर शोधत असतांना "माझ्या आईकडून मी काय घेतले ..?" हे मी माझ्या मनाला विचारलेे...


आईचे आपल्या आयुष्यात कायमच खूप महत्त्वाचं स्थान असतं.लहान असताना पहिला शब्द मुलं उच्चारतो तो तर 'आई '...आपल्या विश्वासाचे एकमेव ठिकाण असतं 'आई'...आपण जसजसे मोठी होत जातो ,तसं आपलं विश्वही रुंदावत जातं. हळूहळू मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यात एक स्थान बनवतात...त्यानंतर सहज मिळालेलं हळुवार नातं... तोच लग्नानंतर आपला जोडीदार बनलेला... त्यानंतर आपला संसार, आपली नव्याने निर्माण झालेली नाती..असं आपलं विश्व विस्तारत जातं. पण हे सगळं घडत असताना त्या येणाऱ्या प्रत्येक घडीला सांभाळण्याचे मार्गदर्शन मिळाले ते माझ्या आईकडूनच..


गोतावळा असलेल्या घरात प्रत्येकाला काय हवं आहे काय नाही ह्याची काळजी करणे, घरातल्या प्रत्येकाला काय खायला आवडतं ह्याची आठवण ठेवणे , कोणाला काही दुखत असेल तर स्वतः वून तिचे घरचे औषध हातात आणून देणे, हे तिला छानच जमातं.. तिचे ते सदाबहार वाक्य "काही दुखतं नाही ना..." हे विचारण्याचे शल्य मला माझ्या आईकडून मिळाले....


जीवनात कितीही कठीण प्रसंग आला, दुःखाचा डोंगर पसरला , येणारा प्रत्येक दिवस सारखा येत असतो असे नाही त्यामुळे आलेल्या संकटांना त्याला सकारात्मकतेने, धैर्याने लढण्याची ताकद मला माझ्या आईकडून मिळाली...माणूस ह्या त्याच्या चुकांमधून शिकत असतो. आणि आपल्याकडून चूक झाली असल्यास ती मान्य केल्याने तो लहान होत नसतो तेव्हा चूक झाली तर घाबरून न जाता, त्यातून मार्ग काढायची दिशा शोधन्याची मला माझ्या आईकडून मिळाली....


सासू ही कधी आई होऊ शकत नाही आणि सून ही कधी मुलगी होऊ शकत नाही ,पण सासू सुनेच्या त्या नात्यात शब्दांची हेराफेरी , शब्दाला शब्द लाऊन तयार होणारे वाद न बोलता कसे टाळता येईल हे मी माझ्या आईकडून शिकले....


मी लहान असतांना माझ्या आईला सगळे हिटलर असे म्हणतं. कारण ती सतत माझ्या मागे "काही तरी कर " असा अट्टाहास ती धरत. ती विणकाम, शिवनकामतात, पेंटींग करण्यात ,अगदी निपुण पण... ह्या सगळ्या गोष्टी मी शिकाव्या अशी जबरदस्ती तिची मुळीच नसे. अडीअड्चणीत मला हे येत नाही असे ही तिने होऊ दिले नाही... हो, कारण तिला असे वाटतं असावे जे मी शकले नाही ते माझ्या मुलीने शिकावे...म्हणून तिने संगीत, कला , वक्तृत्व ,कथाकथन अशा क्षेत्रातले धडे मी घ्यावे असे तिला वाटले...

ती म्हणायची ," तू जे पण करशील मन लाऊन कर, तुला तुझा नावाने लोक ओळखतील अशी तुझी ओळख निर्माण कर..." असेच प्रोत्साहन देणार भाष्य मला माझ्या आई कडून मिळाले...


हे सगळे करीत असतांना त्याचे लिखाण करण्याचे काम माझी आई करत असे... माझी स्पर्धेसाठी तयार केलेली भाषणे, आकाशवाणी वरील माझे कथाकथन, वादविवादातील मुद्दे हे सगळं तीच लिहून काढायची. आणि मी जसे -च्या -तसे बोलून यायची. आज माझ्या लिखाणाच्या प्रयत्नाला जी दाद मिळते आहे ते लिखाणाचे कौशल्य नकळत मला माझ्या आईकडूनच मिळाले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही... 


जिचे शब्दात वर्णन होणे नाही

जिची जागा कोणी घेणे नाही

माय, माता, माऊली ,जन्मदात्री

"आई" तुझ्यासारखी ह्या जगतात कोणी होणे नाही...


तुझ्यासारखी फक्त तू...


मायेचा पदर तू...

सुखाची चादर तू...

प्रेमळ हळूवार स्पर्श तू...

निश्चिन्त झोपेचा आधार तू..

दुखवलेल मन सवरणारी तू..

मनात पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तू..

वाटेत आलेल्या अडथन्यातून मार्ग दाखवणारी तू..

चुकलेली वाट बरोबर दाखवनारी तू..

न बोलता मनातलं जाणणारी तू...

तुला नकळत दुखावले तरी जवळ घेणारी तूच...

"सगळं छानच होईल.."असा आधार देणारी तू

"माणसाने नेहमी शिकत राहावं " सांगणारी तू

जीवनात नवचैतन्य निर्माण करणारी तू...

स्वप्नांना मूर्तिमंत आकार देणारी तू..

अंधाऱ्या वाटेत प्रकाशमय मार्ग दाखविणारी तू...

आयुष्यात भविष्यातील रंग भरणारी तू...

यशाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असणारी तू..

शब्दात जिचे वर्णन करणं अशक्य असणारी तू...

माझा पहिला गुरु, माझा कल्पतरू ,माझा देवही तू..

जिची महिमा अपरंपार अशी "आई".. फक्त तू 


Rate this content
Log in