Neha Khedkar

Others

3  

Neha Khedkar

Others

आई, तू लवकर बरी हो..!

आई, तू लवकर बरी हो..!

4 mins
1.1K


मंजिरीला लग्न झाल्यावर लवकरच तिला कळलं की मी पेक्षा माझ्यावर अवलंबून असलेली खूप लोक आहेत. लग्नामुळे आपला जीवनसाथी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब देखील आले. जबाबदाऱ्या वाढल्या आणि स्वत:ची काळजी कमी झाली. पतीवर असलेले प्रेम आणि काळजी हे स्वत:च्या काळ्जीपेक्षा वरचे होते. शाळेत असल्यापासून लग्न होई पर्यंत नियमित रोज योगासन ,कमी तेलात केलेली भाजी, भरपूर कोशिंबीर, संध्याकाळी बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाणे अशा अनेक गोष्टी ती आवर्जून करीत होती. ताप येणे, चक्कर येणे, हात पाय दुखणे ह्यातील एकही गोष्ट तिला माहिती नव्हती. वर्षातून अगदी एखाद्या वेळी ती घरी आजाराने झोपली आहे असे व्हायचे. 


प्रत्येक घराचं घरपण म्हणजे घरातील आईच्या चेहरऱ्यावर एक छानसा स्माईल आणि त्याच घरात वावरणारी आनंदी हसरी लहान मुले. मुले ही देवाघरची फुले असे म्हणतात ते खरंच आहे. टवटवीत फुले जसे चित्ताला मोहवतात, त्याप्रमाणे घरातील लक्ष्मीचा उत्साही आनंदी चेहरा हा घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती देत असे. हेच मंजिरी सातत्याने करत आली होती. 


लग्नाला 3 वर्ष झाली आणि लक्ष्मीच्या रुपात लेकीचे आगमन झाले. आणि लागलीच दोन वर्षात गोंडस मुलाचे. आणि पुन्हा, प्राधान्यक्रम बदलले. तिचे जग आता तिच्या मुलांभोवती फिरत होते; त्यांच्यासाठी काय चांगले आहे ते खाणे, त्याच्यासाठी चांगले काय करणे, रात्रंदिवस त्याची देखभाल करण्यासाठी जागृत रहाणे अशा अनेक गोष्टींमध्ये बहुतेक वेळ तिच्या चिमुकल्यासाठी समर्पित होता आणि जे काही शिल्लक होते ते नवऱ्यासाठी होते.


'स्वच्छ सुंदर माझे घर’ हे तिचे आवडीचे काम होते. पण मुलं आणि त्यांचा बाबामिळून रोज खूप पसारा घरात करुन ठेवी. प्रत्येक गोष्ट मागितल्यावर त्यांना हातात लागे. घरातील प्रत्येक कामाची विभागणी करून सर्वांनी कामे वाटून घेतली तर सर्वांनाच कामाची सवय लागली असती, पण कसलं काय तिला सगळ्यांनी Taken for granted घेतलं होतं. पुस्तकांचे कपाट लावणे, कपड्यांच्या घड्या घालणे, झाडांना पाणी घालणे, देवपूजेची तयारी करणे, दररोज डबा, वॉटरबॅग भरणे, केर काढणे, कपाटे पुसणे इ. कामे ती एकटीच करायची. 


वर्षामागून वर्षे उलटून गेली पण घर, मुलगी ,नवरा आणि part time जॉब चालू झाला होता ; अजूनही सगळी कामे स्वतःच करायची. घरात तिला कोणाचीच मदत नव्हती. सगळ्यांना सगळं हातात द्यायची सवय तिनेच लाऊन घेतली होती आणि ह्यातच तो रविवारचा दिवस होता. 


आज सगळ्यांना सुट्टी होती, पण आईला कधी कुठे असते सुट्टी. ती नेहमी प्रमाणे तिचा घड्याळाचा गजर होण्याआधीच उठली. कारण आज सुट्टी म्हणून सगळ्यांचा वेगवेगळ्या खाण्याच्या फर्माईश होत्या. छान तयार होऊन ती स्वयंपाकघरात जाणार ह्यातच तिला चक्कर येऊन ती दारातच पडली. जोरात आवाज झाल्याने सगळ्यांनाच जाग आली. नवऱ्याने तिला उचलून पलंगावर नेले. आणि लागलीच गाडीत बसवून डॉक्टरांकडे नेले.  


अचानक चक्कर येऊन पडल्याने पाय मुरगळला होता त्यामुळे पायाला आठ दिवस पूर्ण आराम हवा होता. "आठ दिवस पलंगावरून खाली उतरायचं नाही,", हे शब्द कानी येताच तिच्या मनात अनेक गोष्टीचा हिशेब सुरु झाला. विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्यामुळे तिची तारांबळ उडाली. आता सगळ्यांचे कसं होणार हा विचार करुन तिचे डोळे भरुन आले. आणि खरोखर अशक्तपणा जाणवल्यामुळे, मी काही दिवस त्यांच्याकडे लक्ष देऊ शकणार नाही ह्याची मंजिरीला पूर्ण खात्री पटली. झोपेची कमतरता, विश्रांतीची कमतरता आणि पोषक तत्वांच्या अनेक कमतरतेमुळे मला या राज्यात आणले हे तिला कळलेे.


मंजिरी पडताच नवऱ्याचे आणि मुलांचे मात्र डोळे उघडले आणि डॉक्टरांनी आठ दिवस पूर्ण आराम सांगितला. डॉक्टरांनी नवऱ्याला चांगलेच खडसावले. नवऱ्याला ही आपली चूक समजली. डॉक्टरांकडून घरी येऊन त्याने मंजिरीचा हातात हात घेत "सॉरी " म्हणले. आणि आजपासून प्रत्येकाने आपापली कामे करायची असा ऑर्डरच सोडली.


पुढच्या पंधरा मिनिटात घराचा कायापालटच झाला. सगळ्या वस्तू जागच्या जागी आल्या. आज कधी नव्हे तो नवऱ्याने बनवलेल्या खिचडीचा बेत बनला. नवरोबला स्वयंपाक करायला खूप आवडायचं हे त्याला आज परत आठवले. मुलीने डाळ तांदुळाचे प्रमाण मंजिरी कडून तपासून तिच्या बाबाला स्वच्छ करुन तिच्या बाबाला दिले. मुलाने काकडी, टमाटर तोडके मोडके का होइना कापून टेबलवर ठेवले. टेबलवर सगळ्यांचे ताट वाढले. दहा मिनिटात खिचडी तयार झाली. जेवणं आटपून आज सगळं स्वयंपाकघर तिघांनी मिळून आवरलं. नवऱ्याने मुलांना आवाज देऊन हाताने पाणी घ्यायला सांगितले. मुलांनीही पट्कन उठून स्वतः पाणी घेतले आणि मंजिरीलासुद्धा दिले. 

मंजिरीला हे सगळं बघून फार आश्चर्य होत होते. कोणतेही काम लहान नसते हे आज घरात सगळ्यांना कळले ह्याचे तिला मनापासून चांगले वाटले. आज मंजिरी स्वयंपाकघरात नव्हती पण रविवार असल्याने काहीतरी गोड खायची परंपरा तिच्या नवऱ्याने मोडली नाही. 


आज छान मंजिरीच्या आवडीचे आइसिक्रीम मुलगा घेऊन आला. तिच्या हातात आईस्क्रीमचा कप देत तिला म्हणाला,

"आई लवकर बरी हो. आम्हाला तुला बघून तर अंगात उत्साह येतो. तू आजारी झाल्याने सगळं घर क्षणात आजारी झाल्या सारखं वाटत आहे गं." मंजिरीच्या मुलाच्या डोळ्याला धारा लागल्या. 

" आई आजपासून मी शाळेतून आल्यावर तुला स्वयंपाकात नक्की मदत करेल आणि आज पासून माझं सामान सुद्धा मीच उचलणार ..!" मुलीने मंजिरी च्या कुशीत येऊन आपले तोंड लपवले...

कविता करण्याचा छंद असलेल्या नवऱ्याने "इर्शाद "म्हणत कवितेला सुरुवात केली....


कोमल तरी कणखर तू

तारेवरची कसरत तू

माहेरचा लाडोबा असली तरी

सासरची बाणा आहेस तू

अखंड मायेचा सागर तू

लाजरी, बावरी,खट्याळ जराशी 

तितकीच संयमी आणि हुशार तू

मुलाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी

त्याच्या विरहाने रडणारी तू

थोडे थोडे करत करत

पैसांची बचत करणारी तू

कुठे गरज पडली तर

एकटीच कामाला जुंपणारी तू

सर्वांचे आजारपण सांभाळणारी तू

घर आणि नोकरीचे समतोल राखणारी तू

सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा तू

आपल्या घराची अन्नपूर्णा तूच

आणखी काय वर्णावी तुझी महती

प्राणाहून प्रिय आमच्या सर्वांची तू...!


"लवकरात लवकर बरी हो. तू आम्हला आमची फिट आई म्हणून हवी आहेस...!" म्हणतं मुलं तिला बिलगली. नवऱ्याने देखील तिला त्याच्या मिठीत घेतले. 


एक परिपूर्ण आई आणि पत्नी होण्याचा प्रयत्न करताना मंजिरी स्वतःला खरी विसरली होती. तिचे छंद असलेले नृत्य, चित्रकला, व्यायाम आणि पुस्तक वाचणे सोडले होते. स्वतःची काळजी घेण्याव्यतिरिक्त, तिला तिच्या दैनंदिन नियमाप्रमाणे 'तिचा वेळ' पाहिजे होता ज्यामध्ये ती विश्रांती घेईल , तिच्या आवडत्या गोष्टी करेल हे तिने मनाशी पक्के ठरवले. यापुढेे, मला माझ्या कुटुंबासाठी माझे कर्तव्य बजावण्यात ,त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात मदत होईल. आणि तेव्हापासून माझा मंत्र "आई फिट तर आम्ही फिट" हे गणित तिच्यासोबत सगळ्यांनी आत्मसात केले. 


Rate this content
Log in