Neha Khedkar

Others

3  

Neha Khedkar

Others

आहेत तरी काय हो अजून अपेक्षा..

आहेत तरी काय हो अजून अपेक्षा..

4 mins
687


" आनंदी, माझा चहा कुठे आहे..? माझा डबा तयार आहे ना..?"


" आई माझी कॉलेजची बॅग कुठे आहे...? माझा फोन पाहिला का.."



"आई मला दुसरे मोजे हवेत...हे खूप घाण झालेले आहेत.."



ही अगदी रोजची सकाळची टेप आनंदी ऐकत असते आणि 

तिला काय हवं ह्या पेक्षा सगळ्यांना सगळं व्यवस्थित भेटलं ना, ह्याची काळजी करीत असते...




कॉलेज मध्ये सगळ्या विषयात टॉपर असणारी आनंदी... शिक्षण सुरु असतांना आई वडिलांना लग्नाची घाई होते. पण शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही म्हणतं मुलगा बघायला होकार देते... अर्थात होकार फक्त आपलाच राहिलेला असतो...




मग वेळेत लग्न होऊन एक सून तर कोणाच्या मनाची राणी म्हणून नवीन आयुष्यात पदार्पण करते...अगदी हळुवार पणे प्रत्येक गोष्ट समजून घेण्यात लक्ष केंद्रीत करते... घरच्यांच्या आवडी निवडी, चालीरीती, खाण्याच्या पद्धती सगळं अगदी खाली मान घालून आत्मसात करते...




कुणी काही बोलू नये म्हणून अगदी जीवाचे रान करते... प्रत्येक माणूस वेगळा हे आपल्याला ठाऊक असलं तरी समोरचा आपल्याला समजून घेईल अशी अपेक्षा करीत नाही...काहीही झालं तरी मनात हेच भाव ठेऊन नवजीवनाची सुरवात करणारे आपण...!




पण हे सगळं करता करता तीच वाचन मात्र दांडग करते...इंग्रजी, मराठी ,हिंदी सगळ्या भाषांची पुस्तके ती वेळ काढून वाचत असे.. कधी नव्हे ते कागदावर मानाचं प्रतिबिंब उमटून ती मन मोकळे उडते..आपल्या स्वभावाला इतकं निर्ढावतं कसं बनतं आपल्याला कळतच नाही...हे तिला जाणवतं...




आपण आपल्या बाजूने कितीही चांगलं राहण्याच्या प्रयत्न केला तरी लोक आपल्या चुकाच काढून देतात हे जेव्हा लक्षात येत तेव्हा आता आपल्याला जे आवडतं जे पटतं तेच करायची अशी भावना आपोआप निर्माण होते...




 आपला खरा आनंद आपल्यामध्येच आपल्या लोकांमध्ये आहे ह्याची पूर्णतः जाणीव होते...आणि जे हवं जसं हवं ते करायला सुरवात करते...अर्थात ह्यात काही लोकांची मने दुखावली जातात पण मग आपण आपल्यासाठी कधी जगायचं हा प्रश्न मनात घोळका घालतो...




आज सोसायटीमध्ये खास पार्टीचे आयोजन केले असते, ते सुद्धा फक्त सोसायटी च्या महिलांसाठी..! जरा अटपट होत, पण तिने सुद्धा जावं म्हणून तिने स्वतः चे नाव नोंदविले...पण काय घरात तिला काय हवं कोण विचारत..! सगळे आपापल्या पार्टीला निघून गेले... ही मात्र एकटीच घरात बसली होती...परत एकदा आपलं मन मारुन ती घुटमळत होती...




जायचं तर होत ,पण सासू बाई एकट्याच घरात आहे ,मग कस जाऊ सोडून...गेली आणि मुलं आणि नवरा आला तर काय म्हणेल..." असे असंख्य विचार मनात गिरकी घेत होते...  तेवढ्यात दारावर बेल वाजली..तिच्या मैत्रिणी तिला घ्यायला तिच्या घरीच पोहोचल्या...त्या तिची परिस्थिती जाणून होत्या... पण आज कोणीच तिचं ऐकायला तयार नव्हतं...




शेवटी घराला कुलुप लाऊन ती सोसायटीच्या पार्टीला कपाटात अगदी खाली गेलेला, वाढदिवसाला तिनेच तिच्या साठी घेतलेला छान वन पीस तिने घालत छान तयार होऊन गेली...उखाणे , गाण्याच्या भेंड्या, आईच पत्र...असे अनेक बालपणीचे खेळ खेळत त्या आठवणी गिरवत तिथेच रममाण झाली... सगळ्यांनी बनवलेली वेगवेगळी पदार्थ टेस्ट करून ती वेळेतच घरी परतली...हे सगळं करतांना तिच्या कॉलेजच्या इंग्लिशच्या मॅडमचे एक वाक्य तिच्या कानात सारखं घुमत होते...



You need to learn, respect and take care of yourself...You are only responsible for your happiness and sorrows...!




आणि तिने पदराला गाठ बांधली...नवीन वर्षाची सकाळ एक नवीन संकल्प घेत सुरु करणार, हे निश्चित केले..आणि गालातच हसून झोपी गेली...




नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून आंगण सडा करण्याची तिच्या घरी रीत होती. ती करते पण कधीतरी तिला सुद्धा सुट्टीच्या दिवशी जरा नितांत झोपावे वाटते... आणि त्या दिवशी ती नऊच्या काट्याला सूर्यदेवाचे दर्शन घेतले...




स्वतः सोबत आज सगळ्यांना कामाला लावते. चहाचे कप हातात न देता टेबलवर ठेऊन सगळ्यांना तिथेच बोलावते... कुणी आपला दिनक्रम सांगायचा आधी तीच पहिले बोलायला सुरवात करते... घराच्या साफसफाईची जबाबदारी तिची एकटीची नसून सगळ्यांची आहे, सांगत प्रत्येकाला घराचा एक कोपरा स्वच्छ करायचे काम ती देते...




उशिरा का होईना सगळ्यांना देवाजवळ दिवा लावायला लावते. त्यांचे नामस्मरण करुन मनोभावे सगळ्यांच्या कुशल मंगलाची हात जोडून प्रार्थना करते...




नेहमीच सुट्टीच्या दिवशी सगळ्यांची काही ना काही खायची फर्माईश असते, पण आज जेवायला ती तिच्या आवडीचा बेत करते. कोण काय म्हणेल ह्याकडे दुर्लक्ष करते... नेहमी सारखा छान टेबल सजवते... सगळ्यात शेवटी जेवायला बसणारी ती नवऱ्याच्या बाजूला आपली खुर्ची लाऊन बसते...स्वयंपाक घर आवरायला नवऱ्याची मदद ,नाकारत नाही...नवीन वर्षाचे संकल्प हेच तर आहे...सगळे काम एकटेच करण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन करते...




आरामात अंगणात खुर्चीत बसून आवडतं पुस्तक वाचायला घेते...दुपारचा चहा मुलीने करावा म्हणून बसूनच ऑर्डर करते...आनंदी आज खूप आनंदात असते कारण, आज ससा सारखं न राहता उडणाऱ्या फुलपाखरू सारखे ती तिच्या घरात नांदत होती... तिचा हा स्वतःला आनंदी ठेवण्याचा संकल्प नक्कीच तिचे व्यक्तिमत्व बदलेल असे तिला खात्रीने वाटले होते...





हीच ती आनंदी आणि तिचा नवीन वर्षाचा संकल्प... तुम्ही कोणकोणते संकल्प केले मला सांगायला विसरु नका... वाचत रहा..




Rate this content
Log in