आधुनिक काळातील अकबर बिरबल
आधुनिक काळातील अकबर बिरबल
अकबर बिरबलाच्या कहाण्या ऐकून ,वाचूनच आमची पिढी लहानाची मोठी झाली. मग मिळालेल्या बक्षिसातील अर्धा हिस्सा असो किंवा तीन खांबावर लटकवलेली खिचडी असो यातून योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो संदेश परिणामकारक असा पोहचवला गेला. पण काहींच्या मते आज काल अकबर बिरबल या कपोल कल्पित कहाण्या आहेत असे ऐकिवात येते,अशी पायरी झालीच नाहीत किंव्हा कृष्ण देवराय आणि तेनाली रामन यांच्या वरून या कहाण्या लिहिल्या गेल्या असाव्यात असेही ऐकिवात आहे. तेनाली रामन हा पण खूप बुद्धिमान ,चाणाक्ष, चतुर असा होता त्यामुके त्याच्या बुद्धीचातुर्याच्या कथाही खूप ऐकिवात आहेत. पण आधुनिक काळातील अकबर बिरबल यावर काही भाष्य करायचे झाले तर राजकारणाचा आसरा घ्यावा लागतो, कारण राजेशाही,हुकूमशाही,आता नाही त्यामुळे अकबर बिरबल सध्यस्थितीत राजकारणातूनच शोधावे लागतात .आणि या घडीस मोदी शहा ही जोडी चार शब्द लिहिण्यासारखी समीर आलेली दिसते. मोदींचे राजकारण आणि त्यानं लाभलेली शहांची साथ म्हणजे अकबर बिरबल कथानकच वाटते.. निवडणूका आल्या की यांचे राजकारण बुद्धिबळाच्या पटावर वावरते आणि अकबर बिरबलाची आठवण करून देते...
अकबर बिरबल दोनच पात्रे
इतिहासात नाव कमवून गेली
बुद्धी चतुर्याची जीवनी ज्यांनी
जणू मुहूर्त मेढच रोवली...
आजही ओरीनं स्वरुप
सर्वत्र जोड्या वावरताना दिसतात
काही जिंकतात तर
काही हातोहात हरतात...
पण इतके मात्र खरे बाबांनो
आठवण अकबर बिरबलाची
नकळत क्षणोक्षणी आपल्याला
जाता जाता करून देतात...
