STORYMIRROR

Shakil Jafari

Others

4  

Shakil Jafari

Others

युद्ध भाकरीचे

युद्ध भाकरीचे

1 min
510

देहाबरोबर आत्माही

पोळत राहिला

आमच्या पोटात पेटलेल्या

भुकेच्या आगीत,

तरीही सांडू दिली नाही

कधी चेहऱ्यावर

वेदनांची छटा...


नुसता तडफडत राहिलो

पोट हातात धरून

दाताखाली ओठ दाबीत...

भुकेची दाहकता

आमच्या प्रत्येक श्वासातून

बाहेर पडली तरीही

दिसू दिली नाही तुम्हाला

आणि

सांडू दिली नाही

कधी चेहऱ्यावर

वेदनांची छटा...


ओंजळ भरून

पीत राहिलो आम्ही आमच्या

वैफल्य जीवनाची गरळ

अश्रूंच्या रूपात...

दर दिवस भूकोत्सव

साजरा करणारे आम्ही

सांडू दिली नाही

कधी चेहऱ्यावर

वेदनांची छटा...


पुकारलेच नाही बंड आम्ही

ऐतखाऊ लोकांच्या

अत्याचाराविरोधात,

फुंकलीच नाही रणभेरी,

तरीही

तुम्ही आम्हाला

पराभूत म्हणून घोषित केले,

युद्ध प्रारंभ करण्याअगोदरच...


थांबा...

युद्ध तर अजून व्हायचे आहे,

भूक आणि भाकरीचे युद्ध....


Rate this content
Log in