यश
यश
1 min
203
निकालाची प्रतीक्षा
अखेर आज संपली
कुणाला यश अपयशाची
बातमी सर्वाना कळाली
गेली वर्षभर केलेल्या
अभ्यासाचे चीज झाले
काहींच्या ओठी हासू तर
काहींच्या डोळ्यात आसू आले
यशाने काहीजण हुरळली
आनंदात ते न्हाऊन गेली
अपयश झालेले पुन्हा
नव्याने अभ्यासाला लागली
यश अपयश हे प्रत्येकाच्या
जीवनाचा एक भाग आहे
पुन्हा प्रयत्न करा मित्रांनो
यश तुमच्या पदरी आहे
