STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

व्यसनमुक्त गीत.

व्यसनमुक्त गीत.

1 min
12K

तंबाखुच्या सेवनामुळे 

जाईल समाज आपला वाया 

नको तंबाखू चघळू रे 

नको तंबाखू गिळू रे   


  तंबाखुच्या सेवनामुळे 

येईल तोंडाचा बदबू रे 

येईल वास घाण तोंडाचा 

तुझ्या तंबाखुच्या निकोटीनचा 


   तंबाखुचे सेवन करून 

   नको बोलवू कैंसरला 

   नको बोलवू दारिद्र्याला 

   नको संपवू आयुष्याला  


तंबाखुच्या सेवनामुळे 

होईल पैश्यांची धुळधाण 

नको दुःखाचे मरण 

नको यातनांचे मरण  


  तंबाखुच्या सेवनामुळे 

  येईल संसार उघड्यावर 

  घरादाराची लागेल वाट 

  कुटूंब होईल भुईसपाट  


नको व्यसन जीवनाला 

व्यर्थ आयुष्य जाण्याला 

नको घात आयुष्याला 

अर्थ असावा जगण्याला


Rate this content
Log in