वटपौर्णिमा
वटपौर्णिमा
वटपौर्णिमा सण सुवासिनींचा
आले आनंदा उधाण
वटवृक्षालाही लाभले
संस्कृतीत मानाचे स्थान
सती माय जीच्यापुढे
साक्षात यमराजाही हरला
तिच्या सतित्वाच्या शक्तीने
जीव पतीरायाचा तरला
सौभाग्याचं लेणं माझं
जीवनी लाभो दीर्घायुषी
पूजूनी दरवर्षी पतीसाठी
आयुष्य मागते वटवृक्षासी
नेसूनी सुवासिनी नऊवारी
साजरा करीती सोहळा
शृंगार करूनी पतीव्रता
होती वटवृक्षाखाली गोळा
आरती सजवूनी हाती
बंधन साताजन्माचे
ओटी भरूनी श्रध्देने
वटवृक्षास बांधीती सुताचे
हिरवेगार वटवृक्ष सदा
दान करी प्राणवायूचे
सान्निध्यात या वृक्षाच्या
लाभो आशिर्वाद दीर्घायूचे
