"वस्तिगृृह" (रायफुल)
"वस्तिगृृह" (रायफुल)
आपले 'वस्तिगृह' असे प्रिय घर
'आश्रितांना-आश्रय' देणारे ते थोर ॥धृ॥
आमच्या हृदयात त्याला महत्त्वाचे स्थान
आम्ही सारे येथेच गेलोय राहुन हो शिकुन
आम्हाला येथे सार्यांना सांभाळले मायेनं
दुर जावे लागले तरी सर्वांना येथुन
सार्यांचे येथे विसावलेले मन
येथील येते हो आता सार्यांना आठवण ॥१॥
येथे राहण्यास मिळाले हेच आमचे भाग्य
येथे राहुन शिक्षण घेण्याचेच ध्येय
सार्यांच्या मनात एकच उद्दिष्ट्यं
शिकुन मोठं होण्याची हो जिद्द
वस्तिगृहाशी आमचे नाते असे घट्टं
अतुट नात्यांचा कधी नाही होणार शेवट ॥२॥
दिवसाचे असे काटेकोर नियोजन
सार्यांना येथे वेळेचे बंधन
येथे शिकून हिरे घडले मौल्यवान
विसरणार नाही कोणी येथे गेलेले ते क्षण
येथील आठवणींनी डोळे येई दाटुन
'आश्रयाने' आमचे सुखी झाले जीवन ॥३॥
