STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

वसंत बहरला

वसंत बहरला

1 min
210

नाद कुहू कुहू कानी आला

अंगणी झुलती ललना झुला

हळूच कानी तो कुजबुजला

चल गं राणी वसंत बहरला


आम्रवृक्ष बघ हा नटला

वनात मोहर गंध पसरला

पक्षी गाती मंजूळ गाणी

चल गं राणी वसंत बहरला


गुढ प्रीतीचे तुझे नि माझे

सांगू या गं साऱ्या जगाला

पडदा लाजेचा सार बाजूला

चल गं राणी वसंत बहरला


वसंताची या ओढ मनाला

रंगारंगांनी तोही सजला

विविध रंगी रंग उधळूया

चल ग राणी वसंत बहरला



साहित्याला गुण द्या
लॉग इन