STORYMIRROR

चारुलता राठी

Others

3  

चारुलता राठी

Others

वऱ्हाडी ठसका

वऱ्हाडी ठसका

1 min
185

प्रथमच मी वऱ्हाडी भाषेत लिहायचा प्रयत्न करतेय...

आज आपण बघतोय की, खेडेगावात आपली मुलगी द्यायला तयार होत नाही.... एवढेच काय, पण मुलगी सुद्धा जरी ती दहावी नापास का असेना, ती सुद्धा खेड्यात नांदायला तयार नाही.


असाच आमचा मन्या...लग्नासाठी आतुरलेला....पण मुलगी भेटेल तेव्हा ना! 

एकदा शहरातून आपल्या गावात आलेल्या आपल्या मित्रांसोबत त्याने 

त्याची गत त्याचाच शब्दात ....वऱ्हाडी भाषेत मांडली . ऐका.....


तुहय राजा बर झाल, शहरात तू गेला.

शहरातल्या पोरीसंग तुहय लगीन भी झालं.

तुले पाहून खर सांगू राजा , आता मले कसतरीच व्हते.

मलेबी वाटते आता माह्य लगीन कवा व्हते.

तुया जीन्स पॅन्ट पाहून मले लयी हरिक येते,

पण माह्या बाप मातर मले फगत हाफ पॅन्टच देते.

खरच राजा तुले पाहून मले आता कसतरीच व्हते.

मले बी वाटते राजा आता लगीन करावं

लगीन करून बायकोसंग मस्त सिनेमाले जावं.

आपल्या वस्तीतल्या लंगड्या दिपक्याच लगीन भी झाल, गोऱ्या गोऱ्या बायकोसंग घरी

आंधन ढेर सार आलं,

के सांगू राजा तुले दिपक्याची कहाणी,

मले पाहून जरा आता तो जास्तच मटकते,

आपली गोऱ्या, गोऱ्या बायकोसंग लंगडत लंगडत सिनेमाले जाते.

एक पोरंग झालं, आता दुसरभी व्हते.....

काय सांगू राजा तुले, आता मले कसतरीच व्हते.

माया बापाले मातर माही चिंताच नसे,

आतातरी माह्य लगीन करून द्या, म्हनूश्यान रोज मांग लागतो..

माह्यासाठी माह्या बाप वणवण फिरते,

पण ....काय सांगू राजा तुले.

पोरी बरीचेभि भाव आता लय वाढलेत.

हातामंदी मोबाईल घेऊनशन्या

लई मटकतेत,

सेलफिच्या नादामंदी पोट्याइसंग  हिंडतेत.

त्याइले पाहून मले बी वाटते

आता माह्य लगीन कवा व्हते.


Rate this content
Log in