STORYMIRROR

चारुलता राठी

Others

4  

चारुलता राठी

Others

मातृत्व

मातृत्व

1 min
358

सकाळी सकाळी खूप आठवण आली तुझी आज। 

छोटीशी परी आज माझी खूप मोठी झालीय।

घरभर दुडू दुडू फिरून माझ्या थकलेल्या मनाला recharge करायची,

तीच, आज आई होऊन आपल्या बाळा मागे धावतेय।

जिच्या मुळे पहिलं मातृत्व मी अनुभवलं,

 तीच आज आपलं पहिलं मातृत्व अनुभवतेय ।

खूप छान अनुभूती आपल्या मनात जपतेय मी आज।

जेव्हा माझ्या पिल्लुला बघतेय तिच्या गोड पिलासोबत हसताना खास।

अशीच रहा हसत-खेळत नेहमी तू बाळा,

जपून ठेव त्याच्या साऱ्या आठवणी हृदयात साऱ्या।

बाळाला मोठं करण्यात विसरू 

नकोस स्वतःला,

आपलं बाळ होत असत मोठं

पण आई मात्र असते तिथल्या तिथे।

तो रोज शिकतोय नविन काही काही ।

त्याच्या नवीन शिकण्यात स्वतःला मात्र विसरू नकोस।

त्याच्या सोबत तुही शिक नवीन काही काही ।


Rate this content
Log in