होळी-नवीन संकल्पना
होळी-नवीन संकल्पना
1 min
347
शेजारच्या सख्या-मैत्रिणी
सगळ्याच जमलो आम्ही आज
चर्चा मात्र आमची जरा वेगळी होती खास
आज होळी...
उद्या रंगपंचमी...
अपहरण केलं रावणाने
पण...
अग्निपरीक्षा मात्र दिली सीतेने
का अशी वेळ नेहमी यावी स्त्रियांवर
अत्याचार करणाऱ्यांना मात्र मोकळी वाट जगभर
उमलण्याआधीच आपल्या कोवळ्या
कळ्यांवर केलेत ज्यांनी अत्याचार
त्यांनाच जाळून साजरा करूया
होळीचा हा वार
मगच दुसऱ्या दिवशी
आनंदोत्सव म्हणून करूया साजरी
विसरून दुनियादारी
खेळून रंगाची होळी...
दाखवूया स्त्रीत्वाची नवी उभारी
स्वर्गातून पाहून...
निर्भया, प्रियंका... होतील खूप खुश
पाहून होळीचं हे नवीन रूप...
