ताऱ्यांच्या जगात
ताऱ्यांच्या जगात

1 min

248
रोज रात्री झोपतांना
बाबाच गोष्ट सांगायचे
आई कुठे ??
विचारलं तर..
आकाशाकडे बोट दाखवायचे....
जास्त चमकणारी शुक्राची चांदणी
मला मात्र खूपच आवडायची
गोष्टीतली परी मात्र तूच असायचीच
तुटलेला तारा बघितला की
खूप खुश व्हायचे....
तूच येणार असशील परत म्हणून
त्यालाच शोधत बसायचे...
रोजच रात्री ताऱ्यांच्या जगात
मी शोधते आई तुला
पण तू मात्र कधीच
का ग दिसत नाही मला???
खरच तु तिथेच की
खोटी खोटी आस मनाला ....
सांग ना ग तू कधी
परत येशील भेटायला मला ....
देवाघरची काम आता
आटोप आई झटकन
तुझ्या लाडक्या लेकीला
भेटायला ये बरं पटकन...