STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वंजारी लेक

वंजारी लेक

1 min
226

बाई मी वंजारी गं वंजारी 

राहिल आई बापाच्या आज्ञेखातर !!धृ!!

नाही विश्वासघात मी करणार

नावलौकीक बापाचा जपणार 


शिकून मोठी खूप होणार 

नोकरी धंदा मी करणार

निवड वंजारी समाजाच्या 

वराचीच नक्की करणार 


नवरा वंजारी गं वंजारी करणार

रक्त वंजारी,वंजारी पाहणार 

नाही दुसरा मला चालणार

नवरा कष्टाळू,वंजारी करणार 


नवरा निर्व्यसनी बघणार 

त्याच्या संग लग्न करणार 

जात आमची काटक वंजारी 

लग्न वंजारी माणसाशी करणार 


महाराष्ट्रातील कोणताही वंजारी 

प्रांत,भाषा भेदभाव नसणार 

बाई मी शपथ,गळयाची घेणार 

नवरा वंजारी,त्याची पत्नी होणार 


माझा समाज मलाच तारणार 

विश्वास माझा आहे त्याच्यावर 

नाही वाईट कधीच करणार 

शिकलेला,जोडीदार मिळणार 


नाही वाईट पाऊल उचलणार 

शान बापाची समाजात राखणार 

त्याच्या कष्टाची जाण मी ठेवणार 

दु:ख आई बापास नाही देणार 


माझा समाज माझा अभिमान 

त्याच्या रक्तात माझा प्राण 

कष्ट करून मी खाईन 

त्याच्या सोबत राहिन 


माझा समाज सर्व जगात भारी 

त्याची विश्वभर आहे भरारी 

सगळ्या क्षेत्रात आघाडीवर 

मी नांदेल आयुष्यभर संसारी


नवरा वंजारी मला पाहिजे 

राणी वंजारी रक्ताची होणार 

मला दुसरे कोणी नको बाय 

ही शेवटची इच्छा हाय 


राजा वंजारीच मी पाहीन 

त्याच्या नावाने कुंकू लाविन 

लग्न दुसर्या जातीत करणार न्हाय 

माझ्या जातीचा हाय अभिमान


Rate this content
Log in