Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

वंदन देशसेवकांना

वंदन देशसेवकांना

1 min
11.8K


जगजेठी आला हो धावूनी

तूफान वादळात या

अनंतकरी सेवारत जो

प्रणिपात माझिया तया... १


नभी प्रचंड आकांत हा

धरा विलापी नाहते

शोधात उत्तराच्या जात

प्रश्नांस धाप लागते....२


ग्रसितांच्या सेवेत निशदिन

परिचारिका माऊली होऊनी

वैद्यांचे व्रत सेवाअखंड

अर्पित श्वास कर्तव्यरणी...३


स्वच्छतेचे दूत अविरत

कर्तव्यकर्मी राबती

वाटेवर उभे पोलीसदादा

क्षुधा-तृषेस भुलवती...४


वंदन देशसेवकांना

आज माथा नमवूनी

अचल वीर जवान हे

सज्ज स्वजन विसरूनी...५


झोकूनी दिले स्वतःस

कर्तव्य यज्ञ जाणूनी

न जागवी कृतघ्नता 

अजाण सोंग घेऊनी...६


Rate this content
Log in