STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

वंचना

वंचना

1 min
755

वंचना जीवाची,

ह्दयात ती कोंडलेली.

धडपडतो जीव आत,

गुंते न कधी सुटलली.


      घायाळ ह्या ह्दयावर,

      जखमा इंच इंचावर.

      भावनांचा कोंडमारा,

      भर हसून दाबण्यावर.


सामंजस्य न संसाराला,

बेचिराख करे जगण्याला.

भारावून टाके रितेपणाला,

आपसूकच थारा वंचनेला.


      आप्त स्वकियांचा किनारा,

      मित्रांचा न मिळे सहारा.

      वंचना वर ठेवून पहारा,

      टिपू आनंदाचा मोहरा.


मन करावे मोकळे,

जगणे झाले अवघड.

कुत्सितपणे हसणारे,

ओझ अपेक्षांचं जड.


      अनमोल जीवनास,

      वंचनांच्या पैलूंचे घाव.

      चमकणारा बनला हिरा,

      जिंकून आयुष्याचा डाव


Rate this content
Log in