Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

5.0  

Neha Ranalkar

Others

वंचितांच्या रक्षणार्थ ये भीमा!

वंचितांच्या रक्षणार्थ ये भीमा!

1 min
304


भीमा देऊन शिक्षणाचा हक्क 

दिसली ज्यांना मीठ नि भाकर !

तेच काही स्वार्थी शिकून मूठभर!

विसरले तुमची शिकवण, तुम्हांला! 

जे स्वत:च बनले सरकारी चाकर !


तेच शिकवलं यांनीही मुलाला!

दुसरं काही दिलं या समाजाला?!

विसरले समाज, स्वआत्मभान,

संस्कार नि तुमच्या विद्वत्तेला!


तुमच्या नंतर कधी खरा ज्ञानपिपासू 

नि प्रखर ज्ञानसूर्य नाही तळपला !

आजही गरजच आहे समाजाला!

तुमच्या सारख्याच महामानवाची

वर काढू शकेल पददलित समाज जो 

आहे अद्याप खोलवर गाळात रूतलेला!


जो खरंच वैतागलाय भ्रष्ट राजकारण  

करणा-या ढोंगी नेत्याला!

त्यांच्या हक्क,व्यथा,गा-हाणं न

ऐकताच वेदनांचं गाठोड फक्त

नावाला वेशीवर टांगणा-याला!


Rate this content
Log in