STORYMIRROR

Hemant Redkar

Others

4  

Hemant Redkar

Others

वन माधुरी

वन माधुरी

1 min
232

दूर कोकिळा बनात गाई 

मंजुळ मुरली कानात 

गायी गुरे अन पशुपक्षीही 

आनंदीत या रानात

खळ खळ निर्झर वळत डोंगरा

झेपावतसे तोऱ्यात 

शुभ्र फुले हि पसरत जाती 

दूरदूरच्या गावात 

रंग रंगीले पंख सानुले 

फुलं फुलांवर भिरभिरती 

पंख पाचूचे पसरुनि करीती

मयूर सुंदर नृत्य किती 

दृश्य वनीचे रम्य मनोहर 

स्वप्नाहूनि ते सहज सुंदर 

हिरवी धरणी निळे अंबर

ओढ लाविते मला निरंतर 


Rate this content
Log in