STORYMIRROR

Hemant Redkar

Others

3  

Hemant Redkar

Others

किमया

किमया

1 min
147

कोवळ्या सकाळी

कोवळ्या तृणांवर,

दवबिंदू ते चमकतं होते

सोनेरी किरणे 

अंगावर लेउनी 

मोत्यासारखे भासत होते. 

स्पर्श सुखद मोहवीत होता 

अनवाणी पावले 

चालत होती, 

बाल मन ते वेडावले 

मोती वेचाया धावले 

दवबिंदू हाती आले, 

नयन क्षणभर 

ओलावले.


Rate this content
Log in