अनामिका
अनामिका
1 min
191
किंचित हासतेस
डोळ्यात पहातेस
भाव मनीचे
सांगून जातेस
मनात माझ्या
हुरहूर दाटते
अनामिक ओढीने
हृदय धावते
पण काय झालं,
कुणास ठाऊक?
अर्ध्या वाटेवरन तू
परतून गेलीस.
गतकाळाच्या आठवणी
जाग्या होतात,
जीव माझा
कासावीस करतात.
मी शोधतोय,
पण सापडत नाही,
वाटेवर साऱ्या
अंधार पसरलाय
