विसावा
विसावा
1 min
189
प्राजक्त वनी फुलुनी आला
गंध मधुर दरवळला
हळुवार हुरहूर काळजात नि,
सुप्त भावांकुर फुलला
किलबिलाट द्विजांचा
रानी भरुनी जाई
अवचित वनीच्या राजाचा
आवाज मोठा होई
खळाळणारा निर्झर
कड्यातून प्रसवला
कोसळणाऱ्या धारांसंगे
नाद गंभीर भरला
वनीचे सौंदर्य
नित्य मनी भावले
थकलेल्या जीवाला
तडागे भासले
