STORYMIRROR

Hemant Redkar

Others

3  

Hemant Redkar

Others

धुक्यातली पहाट

धुक्यातली पहाट

1 min
254

कोवळी प्रभात किरणे

पानात सांडणारी

फांद्याफांद्यांवरी 

कलारव ऐकणारी 

उमललेली फुले

गालात हासणारी

प्रभु मंदिरी कुणी

प्रसन्न शोभणारी

संथ निर्झरीणी

सतत वाहणारी 

कनक हर्ष सुमने 

जगा वाटणारी

सोनेरी किरणांचा 

लपंडाव पाण्यात

हळुवार जाग घेते 

धुक्यातली पहाट 


Rate this content
Log in