एक गुराखी
एक गुराखी
1 min
190
हिरव्याकंच बनात,
घुंगुरांचा आवाज
शांत संध्या समयी
गार वारा घेई.
डोक्याखाली दगड,
अंगाखाली मऊ कुरण
तोंडातून निघे
उत्स्फुर्त चरण.
गुरे वासरे हंबरती,
घराच्या दिशेने धावती
फिरुनी यायचं असल्याने
हिरवा विरह सोशिती.
