वजाबाकीचे गाणे
वजाबाकीचे गाणे
दहा छोटे मित्र
खात होते खाऊ
एक गेला घरी
राहिले किती -------------नऊ
नऊ छोटे मित्र
वाचत होते पाठ
एक गेला घरी
राहिले किती ----------------आठ
आठ छोटे मित्र
बसले होते गात
एक गेला घरी
आता राहिले किती ------------सात
सात छोटे मित्र
बसले खाली पहा
एक गेला घरी
आता राहिले किती------------ सहा
सहा छोटे मित्र
करू लागले नाच
एक गेला घरी
आता राहिले किती------------ पाच
पाच छोटे मित्र
आहेत बरं हुशार
एक गेला घरी
आता राहिले किती------------- चार
चार छोटे मित्र
वाजवू लागले बिन
एक गेला घरी ज्योती
आता राहिले किती--------------तीन
तीन छोटे मित्र
आहेत बरं कोण कोण
(मुले नाव सांगतील)
एक गेला घरी
आता राहिले किती------------ दोन
दोन छोटे मित्र
खात होते केक
एक गेला घरी
आता राहिले किती----------- एक
एक छोटा मित्र
एकटाच उभा राही
तोही गेला घरी
आता मात्र कोणीच नाही
कोणीच नाही म्हणजे------------- 0
शून्याचा आकार कसा गोल
शून्य म्हणजे झिरो