STORYMIRROR

Pakija Attar

Others

4  

Pakija Attar

Others

विठूचा गजर

विठूचा गजर

1 min
176

वारी चालली बघा पंढरीला

विठूचा गजर असे सोबतीला


अन्नछत्र उभारी जातिभेद विसरला

गावोगाव पंगती मान वारकरीला


अनवाणी चाले मुखी नाम विठुराया

अनोळखी तरी साद एकमेकाला


ऊन वारा पाऊस नाही डगमगला

जीव आतुर होई विठूच्या दर्शनाला


Rate this content
Log in