STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

विठू माऊली

विठू माऊली

1 min
464

चाले पाऊली

मुक्ताई सानुली

ज्ञानराज माऊली.


वारी पंढरी

बंदिस्त अंतरी

विठ्ठल ह्रदयांतरी.


माझे माहेर

संतांचा आहेर

पांडुरंग तो हेर


कामात दंग

जनाईच्या संग

तोच गाई अभंग


माझी विठाई

बहीण मुक्ताई

वामांगी रखुमाई.


उभा मंदिरी

चंद्रभागे तीरी

त्या वाळवंटी शिरी.


धन्य पंढरी

थोर वारकरी

माझा सावळा हरी.


पंढरपूर

आता नसे दूर

भक्तीस आला पूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन