विठ्ठलाची मूर्ती
विठ्ठलाची मूर्ती
1 min
227
विठ्ठलाची मूर्ती डोळे भरून पाहू
पंढरीस जाऊ सारे पंढरीस जाऊ..
दोन्ही हात कमरेवरती पाय विटेवरती
विठू सावळा सुंदर दिसे साजिरा किती
ठेवू चित्ती भावभक्ती पहातच राहू..
पंढरीची वाट नाही सरळ आणि साधी
मनाची तयारी करावी लागते हो आधी
पायी चालताना विठूचे गुणगान गाऊ..
मंदिरात टाळ विणेचा घुमतो नाद कानी
होतसे गजर टाळ्यांचा दोन्ही हातानी
विठ्ठलाच्या दर्शनाने आनंदात न्हाऊ..
(चाल - देहाची तिजोरी....)
