STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Others

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Others

विठ्ठल माऊली

विठ्ठल माऊली

1 min
136

वात्सल्याची बरसात 

आभाळागत ती छाया 

तुझ्या चरणी मस्तक 

तुच माझी विठुराया


शब्द तुझे गोड मध 

तु संस्कारांचा पाया

उन्हातही मी जपते 

तुझीच प्रेमळ माया


ज्ञानाची तु सरस्वती 

तुच ग्रथाची ग खाण 

तुझ्या प्रत्येक शब्दात 

वाढे अमृताच ज्ञान


तुझ प्रेम खरं आई

आहे जगाहुनी भारी 

देव पण सांगतात 

आई विना मी भिकारी


तुच माझी ती यशोदा

मी तुझा ग बाळ तान्हा 

जन्म दे तुझ्याच पोटी 

जस नटखट तो कान्हा


Rate this content
Log in