STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Others

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
385

रात्रीच्या काळोख्यात 

दिसते मला आई 

खरंच सांगते भाऊ 

मला नाही लग्नाची घाई.....!

आईच्या त्या प्रेमाने 

आयुष्य झाले पावन 

हातात देऊन कलम माझ्या 

फुले द्या नवं जीवन......!

हातात असेल कलम माझ्या 

घडवीन मी नवलाई 

खरंच सांगते भाऊ 

मला नाही लग्नाची घाई.....!

स्वप्न मला बघायचं आहे 

भाऊ नका करु तुम्ही घाई 

हातात माझ्या लेखणी नाही 

मग का लग्नाची घाई.......!

लग्न हे उद्देश नाही 

माझ्या या जीवनाचे 

सार्थक होऊन जगायचं आहे 

जीवन हे मोलाचे.......!


साहित्याला गुण द्या
लॉग इन