Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

4.5  

Neha Ranalkar

Others

विषय:- कोजागिरी पौर्णिमा

विषय:- कोजागिरी पौर्णिमा

1 min
653


कोजागिरी पौर्णिमेची आली

रात्र शरदाचं चांदणं माळून |

कैवल्याच्या चांदण्याला चकोर 

भूकेला जात असे भाळून | | १| |

 

को जागर्ति? कोण जागे विचारत

देवी लक्ष्मी करी पृथ्वीवर संचार |

सजग व्यक्तीस आरोग्य, धन देई

लक्ष्मीमाता दिसता संस्कार | |२| |


आतुर जो ज्ञानासाठी सदा राही 

जागृत ठेवून प्रसन्न मनाला |

शीतल चंद्र प्रकाशातल्या दूधाचं

प्राशन आरोग्य देई तनाला | |३| |


कोजागिरी पौर्णिमेस उत्साह,

आनंद संचारतो जनाजनांत |

अध्यात्माच्या सवे आरोग्य नांदे

संगीताच्या साथीने तनामनांत | |४| |


कोजागिरी पौर्णिमेला उत्साह आनंदाने सण साजरा करत जागे राहाणा-यांना सजग ,जागृत अशा ज्ञानपिपासूवृत्तीच्या भक्तांना लक्ष्मी देवी,धन, आरोग्य प्रदान करते तीच अख्यायिका ह्या कवितेतून वर्णन केली आहे!


Rate this content
Log in