Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

5.0  

Neha Ranalkar

Others

विषय:-आमचे पंढरीचे वारकरी!

विषय:-आमचे पंढरीचे वारकरी!

1 min
240


पंढरीचे आमचे वारकरी|

शोभे दिंड्या पताका करी||१


पालखी मिरवती खांद्यावरी|

 तुृळस घेऊन डोक्यावरी||२


जाती माहेरासी पंढरी|

ओढ विठुरायाची अंतरी||३


तिष्ठत परब्रह्म उभे विटेवरी|

दोन्ही कर ठेवूनी ते कटेवरी||४


घेऊनिया टाळ मृदंग करी|

गळा माळ होती माळकरी||५


भजनात दंग होता टाळकरी|

आषाढी कार्तिकी करुन वारी||६


पाहे वाट सावळया महाद्वारी|

आलिंगन भेट घेती उराउरी||७


सावळा व्यापून राहे चराचरी|

त्यांचे कष्ट दु:ख पांडुरंगच हरी||८


आस राहो भेटीची मनी निरंतरी|

नाते अभंग ते जन्मजन्मांतरी||९



Rate this content
Log in